राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना २००४ साली कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्याकडे केवळ सहा महिने उरले असल्याचं सांगितलं होतं. पण संबंधित डॉक्टरांचा अंदाज पवारांनी खोटा ठरवून दाखवला आहे. आज २०२२ साल सुरू असताना ते आठवड्यातील चार दिवस राज्याच्या दौऱ्यावर असतात. २००४ साली कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्यांचा डॉक्टरांशी जो संवाद झाला होता, याबाबतचा एक किस्सा शरद पवार यांनी सांगितला आहे. ते मराठवाडा कॅन्सर हॉस्पीटलच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हटलं, “२००४ साली मला कॅन्सरचं निदान झालं होतं. यावेळी एक डॉक्टर माझ्यावर उपचार करत होता. तेव्हा मी त्याला विचारलं, माझ्याकडे पाहून तुला काय वाटतं, मला काय झालं असेल? त्यावेळी तो म्हणाला, खरं सांगू का…, मोठे डॉक्टर तुम्हाला खरं सांगत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो. तुमची काही कामं राहिली असतील, तर ती करून घ्या. त्यावर मी त्याला विचारलं, नेमकं काय म्हणायचंय, मला समजलं नाही. त्यावर डॉक्टर म्हणाले, तुमच्याकडे सहा महिन्याचं आयुष्य उरलं आहे.”

हेही वाचा- “राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यश मिळालं असतं तरी…”; शरद पवारांनी सांगितलं उमेदवारी नाकारण्याचं खरं कारण

“त्यावर मी त्याला सांगितलं, पैज लाव… मी काही इतक्या लवकर जात नाही. पुढे हसत त्याला सांगितलं, अगदीच जर तू म्हणत असशील तर तुला पोहोचवल्यावरच मी जाईन, त्यामुळे तू माझ्याबद्दल असा काही उल्लेख करू नको. तेव्हा २००४ साल होतं आज २०२२ आहे, मी अजून जिवंत आहे. मी अजून जाग्यावर आहे,” असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cant die so early said sharad pawar to doctor after he diagnosed with cancer rmm
First published on: 11-07-2022 at 21:53 IST