नागपुरात ओव्हरटेक करताना कार उलटून अपघात, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

हा अपघात झाला तेव्हा फेसबुक लाईव्ह सुरू होतं, ज्यामध्ये हा अपघात चित्रीत झाला आहे

नागपुरात दोन सख्खा भावांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेली कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. पुंकेश पाटील (वय-२८) आणि संकेत पाटील (वय-२३ ) अशी या दोघांची नावं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अपघातापूर्वी कारमध्ये फेसबुक लाईव्ह सुरू होते. त्यामुळे या अपघाताचा थरार फेसबुकवर कैद झाला आहे.

पाहा व्हिडिओ

पुंकेश पाटील आणि संकेत पाटील हे दोघेही नागपुरातल्या कैलासनगरमध्ये रहात होते. काटोल तालुक्यात काही खासगी कामानिमित्त ते चालले होते. झायलो या कारेने जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे मित्रही होते. कार सुरू असताना मित्र फेसबुक लाईव्ह करत होते. त्याचवेळी ओव्हरटेक करताना पुंकेश आणि संकेत या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

हातला येथील शिवाराजवळ जेव्हा गाडी आली तेव्हा एकामागोमाग एक कारना ओव्हरटेक करण्याच्या नादात झायलो कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. ही संपूर्ण घटना फेसबुक लाईव्हवर कैद झाली आहे. पुंकेश पाटीलच्या फेसबुक पेजवर अनेकांनी या व्हिडिओखाली श्रद्धांजलीचेही संदेश लिहिले आहेत.

सुरूवातीला या सगळ्यांचं फेसबुक लाईव्ह पहाणारे मित्र छान, एंजॉय करा असे लिहित होते. मात्र अपघाताची दृश्यं पाहिल्यानंतर त्यांचाही सूर बदलला. तसेच संकेत आणि पुंकेश या दोघांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी श्रद्धांजलीचे संदेश देण्यास सुरूवात केली. या अपघातात पुंकेश आणि संकेत या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल आणि नागपुरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Car accident in nagpur two sibling killed video captured on face book live scj

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या