राहाता :  युनायटेड किंग्डम (युके)  येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्त परिवाराला ५०० रुपये किमतीचे पुजाचे साहित्य तब्बल चार हजार रुपयांना विकुन या भाविकांची फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. साईभक्तांना फसविल्या प्रकरणी शिर्डीत पहिल्यांदाच दुकान मालक व जागा मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश मेहत्रे (पूर्ण नाव माहित नाही,. राहणार सावळीविहिर ता. राहाता),  अरुण रघुनाथ त्रिभुवन (राहणार शिर्डी), सुरज लक्ष्मण नरवडे (पत्ता व नाव माहित नाही)  प्रदीप राजेंद्र त्रिभुवन (राहणार लक्ष्मी नगर, शिर्डी) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या ४ जणांना तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी येथील न्यायालयात आज मंगळवारी हजार केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटने मध्ये प्रथमच हार, फुले व प्रसादाच्या दुकानासाठी जागा देणारा जागा मालक अनिल तात्या आढाव यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.दुकान मालक त्रिभुवन याला सोमवारीच अटक करण्यात आली.

साईभक्तांना फसविल्या प्रकरणी शिर्डीत पहिल्यांदाच दुकान मालक व जागा मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने दुकानांसाठी जागा देणारे मालक व दुकान चालविणारे व्यावसायिक पोलिसांच्या या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व्यावसायिकांनी माफक दरात हार, फुले प्रसाद द्यावा. अशा घटनांमध्ये यापुढे साईभक्तांची फसवणूक झाल्यास अधिक कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिला आहे.

Story img Loader