हिंगोली : येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात गैरकायद्याची मंडळी जमवून, प्राचार्य, उपप्राचार्यांना मारहाण केली. विद्यालयात परीक्षा चालू असताना प्राचार्यांच्या कक्षेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआरचे तार तोडून नुकसान केले. शासकीय कामात अडथळा आणला, या आरोपाखाली शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर त्यांचे सहकारी शंकर बांगर, तसेच विद्यालयातील अधिव्याख्याता श्रीमती कपूर, श्रीमती देशपांडे, श्रीमती शेख, श्रीमती वसुंधरा पाटील, तसेच मंगनाले, फकीरसह ३० ते ४० आरोपींविरुद्ध प्राचार्य अशोक उपाध्याय यांच्या तक्रारीवरून शनिवारी पहाटे हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील तंत्र निकेतन विद्यालयातील प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय व उपप्राचार्य तानूरकर यांना १८ जानेवारी रोजी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर व त्यांच्या समर्थकांनी प्राचार्यांच्या कक्षात जाऊन मारहाण केली होती. विद्यालयात विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना प्राचार्यांच्या कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या डीव्हीआरच्या तारा तोडून टाकल्या, घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीचं रहस्य काय? प्रश्न विचारताच शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय म्हणाले…

प्राचार्य डॉक्टर उपाध्याय यांनी शनिवारी पहाटे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, आमदार संतोष बांगर त्यांचे समर्थक कार्यकर्ते, तसेच विद्यालयातील अधिव्याख्याता यांनी १८ जानेवारी रोजी दुपारी साडेअकरा ते बाराच्यादरम्यान प्राचार्यांच्या कक्षात गैरकायद्याची मंडळी जमवून प्राचार्य व उपप्रचारांना गालात चापट, बुक्क्या मारून अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केली. प्राचार्यांच्या कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या डीव्हीआरचे तार तोडून सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान केले. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या आशयाची फिर्याद दिली असल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात आमदार संतोष बांगरसह ३० ते ४० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा – औरंगाबाद : जन्मदात्याने जुळ्या मुलांना विष पाजून स्वतःचे जीवन संपविले

पोलिसांनी अद्याप पर्यंत आरोपींना अटक केलेली नाही. विश्वसनीय सूत्रांकडून असेही कळते की, प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांनी २५ जानेवारी २०२३ रोजी या एकूण घडलेल्या प्रकाराबद्दल राज्याचे प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षणविभाग मंत्रालय यांच्याकडे सदर घटनेसंदर्भात रीतसर सविस्तर लेखी अहवाल पाठवला होता. त्यामध्ये घडल्या घटनेची इथंभूत माहिती दिली होती. सदर प्रकरणातील अधिव्याख्यात्यांची चौकशी करून निलंबित व बडतर्फ करणे याबाबत, तसेच या सर्व घटनेला बाहेरून सहयोग देणारे प्राचार्यांना डावलून प्रभारी सहसंचालक झालेले तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयातील कार्यरत विभाग प्रमुख अनुविद्युत अभियांत्रिकी यांना त्यांच्या मूळ पदावर पदस्थापना देऊन त्यांच्या ऐवजी नियमित सहसंचालक नियुक्ती करावी, असे अहवालात नमूद केले होते, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been filed against mla santosh bangar along with his fellow activists and some lecturers of tantraniketan vidyalaya hingoli ssb
First published on: 28-01-2023 at 15:27 IST