छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह भाषेत असलेल्या या पोस्टवरून आता केतकी चितळेवर टीका होऊ लागली आहे. या कवितेमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. याप्रकारानंतर तिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्यासह कार्यकर्त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Patil vs laxmi hebbalkar
“त्यांना एक पेग…”, भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांची महिला मंत्र्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव

पवारांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निखील भामरे या व्यक्तिने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला आहे. “वेळ आली आहे बारामतीच्या “गांधी”साठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटनुसार शरद पवार यांना मारण्याचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार धमकी तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.