case registered against atul awtade for marrying twins sisters in akluj spb 94 | Loksatta

जुळ्या बहिणींशी विवाह करणं पडलं महाग; दुसऱ्याच दिवशी नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल

दोन दिवसांपूर्वीच अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह होता. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असताना त्यांच्या आनंदावर आता विरजण पडण्याची शक्यता आहे.

जुळ्या बहिणींशी विवाह करणं पडलं महाग; दुसऱ्याच दिवशी नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल
संग्रहित

दोन दिवसांपूर्वीच अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह होता. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असताना त्यांच्या आनंदावर आता विरजण पडण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे जुळ्या बहिणींशी विवाह करणाऱ्या अतुल अवताडेंविरोधात अकलूजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – “आरे आणि कारेवाल्यांनो कर्नाटक आतमध्ये घुसलं आहे, तुम्ही कधी …?” आशिष शेलारांना उद्देशून संजय राऊतांचा सवाल!

कुटुंबियांनी दिली होती मान्यता

२ डिसेंबर रोजी अकलूजमध्ये अतुल अवताडे या तरुणाने रिंकी-पिंकी या जुळ्या बहिणींनी विवाह केला होता. अतुलच्या कुटुंहबियांनीही या विवाहास मान्यता दिली होती. अतुलचे बहुतांशी नातेवाईक अकलूज परिसरात राहतात. त्यामुळे त्याचा हा अनोखा विवाह सोहळा अकलूजमधल्या गलांडे हॉटेलात पार पडला होता.

हेही वाचा – भाजपा नेत्याच्या शिवरायांवरील नव्या विधानानंतर संभाजीराजे संतापले; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले “जमत नसेल तर…”

अतुल विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी अतुलविरोधात भादंविच्या कलम ४९४ अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अकलूजचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशमुख यांनी दिली आहे.

मुंबईत झाली तिघांची ओळख

रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणी आपल्या वडिलांच्या पश्चात विधवा आईसह मुंबईत एकत्र राहत होत्या. एकेदिवशी आईसह दोन्ही जुळ्या बहिणी आजारी पडल्या. त्यांना अतुल याने रूग्णालयात दाखल केले होते. टॕक्सी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या अतुल याने दोन्ही रिंकी आणि पिंकीसह त्यांच्या आईला आजारपणात केलेली मदत मोलाची होती. घरात पुरूष नसल्यामुळे अतुल आधार बनला होता. दरम्यान, दोन्ही जुळूया बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला. ही बाब दुसऱ्या बहिणीच्या लक्षात आली. दोघीही एकमेकांच्या शिवाय जगूच शकत नव्हत्या. एकीने अतुलशी विवाह केल्यास दुसरीचे जगणे मुश्किलीचे ठरणार होते. म्हणून दोघींही अतुल याच्याशी एकत्रित विवाह करण्याचा निर्णय घेतला. आईनेही दोन्ही जुळ्या मुलींच्या भावना आणि अतुलची सेवाभावी वृत्तीही विचारात घेऊन त्याच्या एकट्याशीच दोन्ही जुळ्या मुलींना विवाह करण्यास संमती दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 17:34 IST
Next Story
‘चला कर्नाटक पाहू’ नागपूर विमानस्थळाबाहेरील बॅनर्स शिवसैनिकांनी फाडले; ठाकरे गट आक्रमक