दोन मुली झाल्यानंतर गर्भवती महिलेचा शेतातील शेडमध्ये गर्भपात करण्याचा धयकादायक प्रकार आटपाडी तालुक्यात रानवस्तीवरील शेडमध्ये उघडकीस आला असून या प्रकरणी ग्रामीण रूग्णालयाच्या अधिक्षक डॉ.वृषाली राउत यांनी पोलीस ठाण्यात पती, सासूसह तथाकथित परिचारिकेविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दहावी, बारावीच्या परीक्षा बहिष्कारावर शिक्षण संस्था संचालक ठाम, म्हणतात…

पिडीत महिलेला दोन मुली असून तिसर्‍यावेळी ती २४ आठवडे, ५ दिवसांची गर्भवती आहे. या महिलेला आटपाडी दिघंची रस्त्यावरील आवळाई फाटा येथे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गर्भपात करण्यासाठी आणण्यात आले होते. तथाकथित परिचारिकेने पिडीतेला गर्भपात होण्यासाठी तीन गोळ्याही दिल्या. हा प्रकार सोमवारी रात्री साडेनउ वाजणेच्या सुमारास घडला.

हेही वाचा >>> सोलापूर विद्यापीठात बीएस्सी परीक्षेत ५० गुणांच्या पेपरला ९९ गुण 

या प्रकरणी पीडित महिलेचा पती विजय लक्ष्मण बालटे, सासू मीनाक्षी लक्ष्मण बालटे (रा.आटपाडी) व खाजगी नर्स मनीषा दीपक आवळे (रा.सांगोला) या तिघावर आटपाडी पोलीस ठाण्यात ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.वृषाली राऊत यांनी गुन्हा दाखल केला. बेकायदा गर्भपात केला जात असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. यामुळे पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत घटनास्थळी जाउन हा प्रकार उघडकीस आणला. घटनास्थळाहून गर्भपात करण्याचे साहित्य, औषधे, सोनोग्रॉफीचा अहवाल आदी मिळाले असून पोलीसांनी तथाकथित परिचारिकेला मंगळवारी ताब्यात घेतले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against three for attempting woman abortion in farm zws
First published on: 07-02-2024 at 17:59 IST