scorecardresearch

हिंगोलीत भाजपाच्या माजी नगराध्यक्षासह पुत्रावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे नेत्यासह त्यांच्या मुला विरूद्ध बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुरुवारी रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Women protection shakti law maharashtra in marathi

हिंगोली: हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे नेत्यासह त्यांच्या मुला विरूद्ध बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुरुवारी रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शहरातील वंजारवाडा भागातील बावीस वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे.

वंजारवाडा येथील रोहन बाबाराव  बांगर याने त्याच भागात राहणा-या (ह.मु. अन्य गावात) एका 22 वर्षीय  विवाहितेवर खिशातील रूमाल तोडात दाबून बलात्कार केला. तर त्याचे वडील तथा माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी घडल्या प्रकाराची वाच्यता  कुणाकडे करू नकोस, आमची बदनामी होईल, जर कुणाला काही सांगितले तर तुला जिवे मारल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणून धमकावल्याचा आरोप पीडितेने हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. तक्रारीत सदर घटना १३ जानेवारी २०२१ ते २० जानेवारी २०२२ या कालावधीत घडली. आपला पती सासरी नांदावयास घेऊन जाईल, या आशेने घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता केली नाही. मात्र आजपर्यंत पती नांदावयास घेण्यासाठी आला नसल्याने ठाण्यात माजी नगराध्यक्ष व त्यांच्या पुत्रा विरोधात धाव घेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पिता-पुत्रा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक एस.एस. आमले यांनी भेट दिली असून या प्रकरणामुळे जिल्हृयाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case registered former bjp mayor his son police crime ysh

ताज्या बातम्या