बीडमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा गहू, तांदूळ पकडला; दोन मालमोटारीसह लाखोंचे धान्य जप्त

माजलगावात काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारे धान्य बुधवारी पकडले. दोन मालमोटारींसह लाखोंचे धान्य जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

बीडमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा गहू, तांदूळ पकडला; दोन मालमोटारीसह लाखोंचे धान्य जप्त
( संग्रहित छायचित्र )

बीड – माजलगावात काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारे धान्य बुधवारी पकडले. दोन मालमोटारींसह लाखोंचे धान्य जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.दोन मालमोटारी मधून गहू आणि तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती.

त्यानुसार कुमावत यांच्या पथकाने महामार्गावरील परभणी नाक्यावर सापळा लावून दोन मालमोटारी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गव्हाचे २२ तर तांदळाचे १९ पोते आढळून आले. यावेळी पोलिसांनी वाहन चालकांकडे धान्याच्या तपशिलाची माहिती मागितली मात्र त्यांना त्याची माहिती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी मालमोटार क्रं. एमएच २६- ७७१७ व एमएच १२- ६७९५ धान्यासह जप्त केल्या आहेत. दोन्ही मालमोटारीचे चालक प्रभाकर पिराजी गायकवाड आणि नवनाथ जीवन अंकुशे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Caught wheat rice going sale black market millions grains seized two vehicles amy

Next Story
बीडमध्ये नूपुर शर्माविरुद्ध गुन्हा
फोटो गॅलरी