कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. दरम्यान, त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा संदेशात अजित पवार म्हणतात, “बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेलं योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेनं जगण्याची ताकद दिली. बाबासाहेब हे त्यांच्या विचारांनं, कार्यानं महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.

Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Loksatta entertainment The movie Mahaparinirvana will release on December 6
‘महापरिनिर्वाण’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाका

बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचं, मानवतावादी शिकवणींचं पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून त्यांची जयंती साजरी करुया, त्यांना अभिवादन करुया. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया. असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आणखी वाचा- Coronavirus : औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ, चार जणांना करोनाचा संसर्ग

कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेला लॉकडाउन आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असंही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.