scorecardresearch

भाजपातर्फे ‘सेवा पंधरवडा’ साजरा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (दि. १५ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे.

भाजपातर्फे ‘सेवा पंधरवडा’ साजरा होणार
(संग्रहित छायाचित्र)

अलिबाग  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (दि. १५ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर) या कालावधीत भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. अलिबाग तालुक्यात देखील भारतीय जनता पार्टीतर्फे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजउपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपा अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांनी दिली. या सेवा पंधरवडय़ात १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने अलिबाग शहरात विविध ठिकाणी ‘रक्तदान शिबीर’ श्री गणेश मंदिर सभागृह, ब्राह्मण आळी, अलिबाग येथे भाजपा अलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, तालुका उपाध्यक्ष सुनील दामले, तालुका सरचिटणीस अजित भाकरे, शंकर भगत, निखील चव्हाण, जनार्दन भगत, देवेन सोनावणे, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, अ‍ॅड. रोशनी ठाकूर आणि भाजपा कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर रोजी रामराज येथे धावीर मंदिर, नांगरवाडी येथे रक्तदान शिबीर भाजपा अलिबाग तालुका उपाध्यक्ष, बोरघर ग्रामपंचायत सदस्य रमेश ढबुशे, विभाग अध्यक्ष अजिंक्य पाटील, चंद्रकांत झावरे, आतीष गायकवाड, सुदाम झावरे, अमर ठाकूर, मोहन शेठ, मयूर झावरे यांनी आयोजित केले आहे. २० सप्टेंबर रोजी सुंदर नारायण मंदिर, चौल नाका येथे  रक्तदान शिबीर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आलाप मढवी आणि युवा मोर्चा कार्यकर्ते यांनी आयोजित  केले असून त्यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, जिल्हा कोषाध्यक्ष सतीष लेले, जिल्हा चिटणीस समीर राणे, केदार आठवले, माणिक बळी, दिलीप पटेल, गजानन झेंडेकर, विश्वास जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

चिंचोटी येथे २३ सप्टेंबर रोजी भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश भांजी आणि चिंचोटी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जगदीश कांबळी, अशोक वारगे, नितीन गुंड, शरद थळे, आणि भाजपा कार्यकर्ते सहकार्य करणार आहेत. २६ सप्टेंबर रोजी थळ विभागात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान ओबीसी मोर्चा रायगड जिल्हा संयोजक जगदीश घरत, सोशल मीडियाच्या जान्हवी पारेख, शैलेश नाईक, पंकज अंजेरा यांनी आयोजित केले आहे. २५ सप्टेंबर रोजी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे संबोधन ‘मन की बात’ व स्व.पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती अलिबाग तालुक्यात बुथ स्तरावर आयोजित केली असून या सर्व उपक्रमांत भाजपा अलिबाग तालुक्यातील  सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपा अलिबाग तालुका सरचिटणीस संतोष हरिभाऊ पाटील व प्रशांत रमण पाटील यांनी केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Celebrated bjp prime minister narendra modi birthday ysh

ताज्या बातम्या