सावंतवाडी : केंद्र सरकारने पश्चिम घाटातील इको- सेन्सिटिव्ह झोनसंदर्भात अधिसूचना जारी केली. त्यात सिंधुदुर्गातील १९२ गावांचा समावेश आहे. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग वनविभागाने आंबोली ते मांगेलीपर्यंतच्या पट्ट्‌यातील २५ गावांचा इको- सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांची संख्या २०० च्या वर जाणार आहे. इको सेन्सिटिव्ह झोनची सूचना जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने खाण प्रकल्प, गौण खनिज उत्खनन तसेच वाळू उत्खननावर बंदी आणली आहे. माधव गाडगीळ समितीने दोडामार्ग तालुक्याचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केला होता. तर कस्तुरीरंगन समितीने हा तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळला होता.

यासंदर्भात वनशक्ती आणि आवाज फाऊंडेशनने उच्च न्यायालयात आंबोली ते मांगेली पट्टयात पट्टेरी वाघाचा वावर असल्यामुळे हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने या पट्ट्यातील २५ गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील दहाहून अधिक गावे इको- सेन्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट होणार आहेत. केंद्र सरकारच्या आदेशामुळे केसरी, असनिये, तांबोळी, गुळदुवे, साटेली तर्फ सातार्डा तसेच झोळंबे, तळकट, कोलझर, उगाडे या गावातील प्रस्तावित खाण प्रकल्पांना चपराक बसणार आहे तर आंबोली, केसरी, फणसवडे, सावंतवाडी शहर, बांदा शहर येथील नव्याने बांधकामांना अडचणी येणार आहेत. तर घारपी गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असून तेथे धरण प्रकल्प सुरू आहे तर माजगाव येथे इको सेन्सिटिव्ह गावांमधून नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे हा महामान इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अडचणीत येणार आहे.

UWW president Nenad Lalovic Statement on Vinesh Phogat Case
Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Mumbai local video of some girls dancing on a marathi song Vatanyacha gol dana in mumbais local train is going viral on social Media
मुंबई लोकलमध्ये “वाटाण्याचा गोल दाणा पोरी…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
Kalachauki mahaganpati video
गणपती आगमन बघायला जाताय? काळाचौकीच्या महागणपती आगमनाला काय झालं पाहा; VIDEO पाहूनच धडकी भरेल
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Tourists Pull The Lions Hair And Then Watch What The King Of The Jungle Does Animal Video Goes Viral
पर्यटकांनी चक्क सिंहाच्या केसांना हात लावला; जंगलाचा राजा संतापला अन् दाखवला असा इंगा की…VIDEO पाहून थरकाप उडेल
Countries Without Indian Population pakistan bulgaria vatican city
जगातील असे ‘हे’ पाच देश, जिथे रहात नाही एकही भारतीय; असे का? जाणून घ्या
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप

हेही वाचा..Sanjay Raut : “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “बाबासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार…”

सावंतवाडी तालुक्यातील गावे

शिरशिंगे, आंबोली, गेळे, सावरवाड, वेर्ले, सांगेली, ओवळीये, आंबेगाव, माडखोल, कुणकेरी, पारपोली, नेने, देवसु, मसुरे, केगद, दाणोली, भोम, निरुखे, चराठे, केसरी, फणसवडे, कारिवडे, बावळाट, सावंतवाडी, ब्राह्मणपाट, सरमळे, दाभिल, उडेली, कोनशी, घारपी, माजगाव, असनिये, तांबोळी, कुंभवडे, डेगवे, बांदा, पडवे माजगाव, पडवे, दांडेली, मडुरा, आरोस, गाळेल, कोंडुरे, सातार्डा, डोंगरपाल गुळदुवे, साटेली तर्फ सातार्डा.

कुडाळ तालुका

कुपवडे, गवळगाव, भटगाव, दुर्गानगर, भडगाव बुद्रुक, सोनवडे तर्फ कळसुली, भरणी, घोटगे, निरुखे, पांग्रड, वर्दे, कडावल, आवळेगाव, कुसगाव, रुमडगाव, गिरगाव, किनळोस, नारुर खुर्द, नारुर, केरवडे, निळेली, पणदूर, वसोली, चाफेली, गोठोस, निवजे, साकिर्डे, उपवडे, पुळास, गांधीग्राम, वाडोस, वालावल, आंबेरी, मोरे, मुड्याचा कोड, कांदोळी, भडगाव, कालेली, तालीगाव, मुणगी, भट्टी गाव, तेंडोली, आकेरी

हेही वाचा…Ajit Pawar : “अशक्य गोष्ट शक्य करणं ही माझी..”, लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांचं विरोधकांना उत्तर

कणकवली तालुका

वांयगणी, शेर्पे, जांभनगर, दारुम धारेश्वर, ओझरम, नागसावंतवाडी, घोणसरी, कोळोशी, फोंडाघाट, डामरे, आयनल, उत्तर बाजारपेठ, कोंडये, हरकुळ खुर्द, सावडाव, माईण, भरणी, कुंभवडे, तरंदळे, गांधीनगर, रामेश्वर नगर, भिरवंडे, हंबरणे, पिसेकामते, वरवडे, नाटळ, दारिस्ते, दिगवळे, शिरवळ, रांजणगाव, कसवण, पिंपळगाव, ओसरगाव, भैरवगाव, व्यंकटेश-वारगाव, नरडवे, जांभळगाव, कळसुली,

वैभववाडी तालुका

तिरवडे तर्फ सौंदळ, नेर्ले, पलांडेवाडी, जांभवडे, आखवणे, मांडवकरवाडी, उपळे, मुंडे, भोम, ऐनारी, भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण, भट्टी वाडी, रिगेवाडी, मधलीवाडी, कुंभार्ली, कुंभवडे, पिंपळवाडी, भुर्डेवाडी, एडगाव, करुळ, नारकरवाडी, नावळे, वयम्बोशी, सांगुळवाडी, वाभवे, निमअरुळे, मोहितेवाडी, सडुरे, शिरोली, आचिर्णे, कुर्ली.

हेही वाचा…Maharashtra Breaking News Live : शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, आता…

देवगड तालुका

घालवली, पोंभुर्ले, फणसगाव, बेळगाव, वाघिरे, म्हावळुंगे, नाद, गढीताम्हाणे, शिरवली, शेवरे, हडपीड, निमदवाडी, चाफेड, लिंगडाळ, साळशी, शिरघेरा, कामते, आरे, तांबळडेग, कुवळे, रेम्बवली, खुडी.