दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमानाने अभिवादन करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्यासाठी एक ट्वीट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींकडून करुन दाखवा. त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते, अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पश्चिम बंगालमध्ये तिघांनी पद्म पुरस्कार नाकारले आहेत. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य मोठे नेते आहेत. पुरस्कार देताना त्यांना विचारले गेले नसावे. अलीकडे उठसूठ कोणालाही पद्म पुरस्कार देण्याची परंपरा सुरु झाली आहे. त्यामुळे नाकारले जात आहेत. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र जिवंतपणी त्यांची किंमत केली जात नाही. बिपीन रावत यांचा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा गौरव केला आहे. मरणोत्तर पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मरणोत्तर द्यायचे नाही असे आपण ठरवले होते,” असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावताच संजय राऊतांनी टीकाकारांना सुनावलं म्हणाले “नामर्दपणाची वक्तव्यं करणाऱ्यांना…”

“वीर सावरकारांना यावेळी भारतरत्न पुरस्कार मिळेल असे वाटले होते. पण सावकर उपेक्षितच आहेत. देवेंद्र फडणवीसांचे दुखः आणि वेदना मी पाहत होतो. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने ट्विट केले नाही ही त्यांची वेदना आहे. मलाही त्यांची वेदना पाहून वेदना झाली. बाळासाहेब ठाकरेंना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव करावा असे का वाटले नाही? बाळासाहेब ठाकरे भारतरत्न तर होतेच. एक ट्विट केले नाही म्हणून तुम्हाला दुःख होत आहे. तुमच्या केंद्र सरकारने बाळासाहेबांना पुरस्कार का दिला नाही याचा खुलासा केला की आम्हाला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ट्विटवर बोलता येईल,” असे संजय राऊत म्हणाले.

“मला पद्मभूषण नको…”; पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांनी नाकारला सन्मान

दरम्यान,“सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे,” असं फडणवीस यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government want to give the award to balasaheb thackeray sanjay raut question to devendra fadnavis abn
First published on: 26-01-2022 at 14:39 IST