सांगली : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे जर शिवसेना शिंदे पक्षात येणार असतील तर त्यांच्यासाठी आमची दारे कायम खुली आहेत, असे प्रतिपादन खा. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी मिरजेत बोलताना केले.

खा. शिंदे म्हणाले, पैलवान पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. यामुळे त्यांनी जर आमच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे स्वागतच आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्त्याला वेळ देणारे नेते आहेत. कुणीही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. यामुळे अनेकजण शिवसेनेत येऊ इच्छित आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. त्यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेवून काही जण पक्ष प्रवेश करत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. चंद्रहार पाटील हे ताकदीचे पैलवान असून त्यांना लागणारी अतिरिक्त ताकद शिवसेना निश्चितपणे पुरवेल असेही त्यांनी सांगितले.