“महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे”

देवेंद्र फडणवीसांची जिरवायची असं आमचं नितीन गडकरींसोबत ठरलं होतं, या विजय वडेट्टीवारांच्या विधानावर त्यांनी भाष्य केलं आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करत असतात. राज्यातल्या पावसाच्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी सादर करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने अद्याप पंचनामे केले नसून कोणतीही मदत दिलेली नसल्याचा आरोपही केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय विषयावरही भाष्य केलं असून महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे, असं विधान केलं आहे.

याविषयी चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. वडेट्टीवार म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची जिरवायची असं आमचं नितीन गडकरींसोबत ठरलं होतं. कारण, त्या दोघांचं जमत नाही.

त्यांच्या याच विधानावर बोलताना पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासायची वेळ आता आली आहे. कारण ज्याला ज्याला जे सुचेल ते तो करत आहे आणि जिरवणे वगैरे हे जाहीर सभेत वापरण्याचे शब्द आहेत का? त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल हा जो स्वभाव महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा झाला आहे, त्याचाच तो भाग आहे. नितीनजी आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. आमच्या सगळ्यांचे पालक आहेत. ते आम्हा सर्वांची काळजी घेतात. त्यांची विचारांवरची आणि पक्षावरची निष्ठा टोकाची आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी हा शोध कुठून लावला ते माहित नाही”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil on mahavikas aghadi government said need to examine their brains vsk

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या