राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापरावरुन आरोपप्रत्यारोप होत असताना जोरदार टीकाही करण्यात येत आहे. सध्या राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यांवरून टोलेबाजी सुरु आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. दरम्यान, आता शिवसेना खासदार संजय राऊत  यांचे बंधु आणि आमदार सुनील राऊत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवजयंतीच्या दिवशी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते सज्जू मलिक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार सुनील राऊत यांनी हे आक्षेपार्ह विधान केलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ईडीकडून राऊत यांच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आलेल्या नोटिसा पाहाता हा व्हिडीओ ताजाच असल्याचं बोललं जात आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

काय म्हणाले सुनील राऊत?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ३० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये सुनील राऊत भाजपाला शिवीगाळ करताना दिसत आहेत. “ये *** भाजपावाले ढूंढ रहे है पैसा किधर है… वो पागल *** लोग…उनको मालूम नहीं, मेरे पास पैसा नहीं है.. मेरे पास ये प्यार है.. क्या उखाडेंगे हमारा? जो करना है करो”, असं या व्हिडीओमध्ये सुनील राऊत बोलताना दिसत आहेत.

यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “गेल्या २८ महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या धमक्या देण्याच्या प्रयत्न झाला. त्यामुळे तुम्हाला जे करायचे आहे ते करा पण आम्ही दुसरी प्रकरणं बाहेर काढणं थांबवणार नाही. आम्ही काढलेलं कुठलंही प्रकरण फेल गेलेलं नाही. तुम्हीही पुराव्याचे आधारे प्रकरण बाहेर काढा. भाजपा स्वतःच्या कार्यकर्त्याला सुद्धा पुरावे सिद्ध झाले तर माफ करणार नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

सीबीआय चौकशीसाठी कोर्टात जाणार – चंद्रकांत पाटील

विधानसभेचे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांनी यावर आक्षेप घेत सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

“माझा महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास नाही पण बरेच अधिकारी त्या प्रकरणामध्ये अडकलेले असतील तर त्यांची चौकशी कशी करणार? त्यामुळे सीबीआयकडून चौकशी व्हावी यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत. अनिल देशमुखांच्यावेळी सुद्धा त्यांनी अशीच टाळाटाळ केली आणि शेवटी हायकोर्टाने आदेश दिला सीबीआयकडे प्रकरण सोपवण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुखांना कोठडीत जावे लागले. त्यामुळे पेनड्राईव्ह प्रकरणात सीआयडी चौकशी लावून तोंडाला पानं पुसणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.