chandrakant patil reaction on tanaji sawant controversial statement on maratha reservation | Loksatta

Maratha Reservation : तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सावंतांचे व्यक्तव्य…”

तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधान विधानावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maratha Reservation : तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सावंतांचे व्यक्तव्य…”
संग्रहित

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधान विधानावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असून त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची…”

चंद्रकात पाटील काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीसांमुळेच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारला ही केस न्यायालयात व्यवस्थित चालवता आली नाही, त्यामुळे हे आरक्षण गेलं. अशा वेळी अडीच वर्षा तुम्ही आंदोलनं का केली नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आंदोलन केले असते, असं तानाजी सावंताना म्हणायचे होते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, “पुढचे दहा जन्म तुमची…”; सेनेकडून जशास तसं उत्तर

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

“रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली होती. मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिवसेनेच्या ‘जनआक्रोश मोर्चा’वर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आदित्य ठाकरे वेदान्ताबाबत केवळ…”

संबंधित बातम्या

“…त्याचा मी पुरावा आणला आहे”, म्हणत आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्रच वाचून दाखवलं!
“देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती होती का?” आदित्य ठाकरेंचा सवाल, उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
“बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील” कोकण दौऱ्याआधी राज ठाकरेंचं विधान
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार? राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले
विश्लेषण : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तच्या अध्यक्षांना निमंत्रण; प्रमुख पाहुण्यांची निवड नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या
पुणे: कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना मुदतवाढ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय
Akshaya Hardeek Wedding : “दाजींना घेऊन येतोय” मित्रच राणादाला होणाऱ्या बायकोच्या घरी घेऊन गेला, पाठकबाई म्हणतात…
पुणे: आम्ही फक्त प्रश्न सोडवायला; राज ठाकरे यांची खंत