“सरकारने हे थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील”; राज्यातील हिंसक घटनांवरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

आज पोलीस लाठ्या चालवतील पण काल जी दुकाने फोडली त्यांच्यावर लाठ्या चालवल्या नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले

Chandrakant Patil reaction to the violent incidents in the state

त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. वाहने आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला. त्यानंतर शनिवारी पुन्हा अमरावतीमध्ये भाजपाने बंदचे आवाहन केले होते. नागरिकांनी दुकाने बंद ठेवली असतानाही मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला आहे. आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पाच टक्के मुस्लीम त्यांच्या नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक आंदोलन करतात त्यावर तुम्ही टीका पण करणार नाही का? प्रत्येक विषयात तुम्हाला भाजपाच दिसते. आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली. एसटी कामगारांवर इतका अमानवीय अन्याय महाराष्ट्राराने कधी पाहिला नाही. यामध्ये भाजपाचा हात असेल तर तुम्ही तिघे समर्थ आहात भाजपाचा हात कापून काढण्यासाठी. तुम्ही तिघे एकत्र असूनही दुबळे आहात आणि आम्ही श्रेष्ठ आहोत असे तुम्हाला म्हणायचे आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“१९९३ साली मुंबई वाचवल्याची फुशारकी मारणारे कुठल्या बिळात लपून बसले आहेत”; भाजपा आमदाराचा सवाल

“यामध्ये सरकारला अपयश येत नाही. सरकारने थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील. राजकारणात आल्यावर याचे गणित कळेल. गृहमंत्री आजारपणातून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. पण सरकार बाहेरून चालवणारे आहेत,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीमध्ये करायचा. अशी परंपराच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा परदेशात घटना घडली की कोलकातामध्ये दंगल व्हायची. लोकशाही मध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण शांततेने करा. अमरावतीमधल्या कालच्या घटनेचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्र्यांचे सामान्य माणसांची ऑफिस फोडली गेली. त्यामुळे भाजपाने नागरिकांच्या इच्छेमुळे बंदचे आवाहन केले होते. आज पोलीस लाठ्या चालवतील पण काल जी दुकाने फोडली त्यांच्यावर लाठ्या नाही चालवल्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil reaction to the violent incidents in the state abn

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे