केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांमुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर तोंडसुख घेत टीकास्त्र सोडलं होतं. यावर भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यास यंत्रणा सक्षम आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर या देशात पहिल्यांदाच धाडी पडल्या आहेत, असं जे बोललं जात आहे. इनकम टॅक्स धाड पडणं, सीबीआयची चौकशी होणं किंवा ईडीनं कारवाई करणं हे कॉमन आहे. बाकीच्या ठिकाणी झालं तर चालतं. तुमच्यावर धाडी पडल्या तर हा सूड उगवण्याचा भाग आहे. हे अधिक वेळ थांबले आहेत, हे पाहुणचार घेत आहेत. अशा प्रकारे म्हणणं बरोबर नाही. पण पुन्हा एकदा त्यांनी ज्या यंत्रणांबद्दल बोललं आहे. त्यांनी त्याचं उत्तर द्यावं.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

गेल्या सहा दिवसांपासून पवार कुटुंबीयांपैकी काहींच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी देखील सलग ५ ते ६ दिवस छापे टाकण्यात आले. यावरून केंद्रीय यंत्रणांचा केंद्र सरकार राजकीय फायद्यासाठी गैरवापर करत असल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांत टीका केली होती. “पाहुण्यांनी पाहुणचार घ्यावा, पण अजीर्ण व्हावं, इतका पाहुणचार घेऊ नये”, असं पवार म्हणाले होते. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil replied to sharad pawar criticism rmt
First published on: 14-10-2021 at 13:33 IST