‘असले प्रश्न संजय राऊतांना विचारा’ म्हणत चंद्रकांत पाटील यांचं स्मित हास्य

माझा तेवढा अभ्यास नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त ओबामा यांनी आपल्या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता, “बराक ओबामा? अहो असले प्रश्न संजय राऊतांना विचारा” असं म्हणत स्मित हास्य केलं.

साताऱ्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका पत्रकाराने दादा अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा असं म्हणत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तेवढ्यात, “अरे बाबा अमेरिका, ओबामा ते काही नको.. ते सगळं संजय राऊतांना विचारा” असं उत्तर प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच चंद्रकांत पाटील म्हणाले आणि त्यानंतर त्यांनी स्मित हास्य केलं. साताऱ्यात भाजपाचा पदवीधर उमेदवार मेळावा पार पडला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

बराक ओबामा यांनी म्हटलं आहे?
“राहुल गांधी हे एक विद्यार्थी आहेत ज्यानं अभ्यासक्रम पूर्ण तर केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत. परंतु त्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी त्यांच्यात ती आग नाही,” असं ओबामा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्राचा आढावा घेतला आहे. यामध्ये बराक ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या आढाव्यानुसार ओबामा राहुल गांधींबद्दल म्हणतात की, “राहुल गांधी यांच्यात एका घाबरलेल्या विद्यार्थ्याचे गुण आहे. ज्या विद्यार्थ्यानं आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याला आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचं आहे. परंतु त्याच्याकडे त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा त्याच्याकडे प्राविण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil takes gig at reporter asks him to question sanjay raut on barack obama scj

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या