scorecardresearch

चंद्रपूरमध्ये शिक्षिकेची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या

वैयक्तिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी

suicide
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एका शिक्षिकेने शाळेतच गळफास आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात असलेल्या मॅकरून या प्रतिष्ठीत व नावाजलेल्या शाळेतील या शिक्षिकेने अज्ञात कारणास्तव गळफास घेतला. शिक्षिकेने शाळेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ललिता दासरिका (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.

बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शाळेतील शिक्षक नेहमीप्रमाणे शाळेत आले असता त्यांना दासरिका यांनी गच्चीवर गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी लगेचच दासरिका यांना खाली उतरवले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पण वैयक्तिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस तपास करत आहेत.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-07-2017 at 13:41 IST