मी रुग्णालयात येणार हे माहित असून देखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारु, असे वादग्रस्त विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयात सोमवारी अमृत दिनद्याल मेडिकल स्टोअरचा शुभारंभ झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते मेडिकल स्टोअरचे उद्घाटन झाले. या दुकानात रुग्णांना २४ तास स्वस्त दरात औषधे मिळू शकतील.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
rape at juhu chowpatty marathi news, high court
भरदिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार करणे अविश्वनीय, आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

हंसराज अहीर हे या कार्यक्रमाला येणार असतानाच रुग्णालयातील डॉक्टर रजेवर होते. यामुळे हंसराज अहीर नाराज झाले. उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना दांडी मारणाऱ्या डॉक्टरांवर नाराजी व्यक्त केली. मात्र नाराजी व्यक्त करताना त्यांनी बेताल विधान करुन नवा वाद निर्माण केला. मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही गोळ्या घालून ठार मारु, अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांना सुनावले.

हंसराज अहीर यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून केंद्रीय मंत्र्याने डॉक्टरांबाबत असे विधान करणे कितपत योग्य आहे, असा सवाल वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींकडून उपस्थित होत आहे.