scorecardresearch

सत्यजित तांबे की शुभांगी पाटील, नाशिक पदवीधरसाठी भाजपाचा कोणाला पाठिंबा? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पाठिंब्यासाठी…”

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सत्यजित तांबे की शुभांगी पाटील, नाशिक पदवीधरसाठी भाजपाचा कोणाला पाठिंबा? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पाठिंब्यासाठी…”
चंद्रशेखर बावनकुळे, सत्यजित तांबे, शुभांगी पाटील (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांमध्येच लढाई होणार असून भाजपा तसेच महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याच पाठिंब्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक माहिती दिली. आम्हाला अद्याप कोणीही पाठिंबा मागितलेला नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा >> संजय राऊत खासदार कोणामुळे झाले? नारायण राणेंचा मोठा दावा; म्हणाले, “हे पाप तर…”

“आतापर्यंत आम्हाला कोणीही पाठिंबा मागितलेला नाही. नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर या मतदारसंघात अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या शुभांगी पाटील या भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्या आहेत. त्यांनी एका वर्षापूर्वीच भाजपात प्रवेश केलेला आहे. धनराज विसपुते हेखील भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. शेवटी जोपर्यंत पक्षाच्या राज्य आणि केंद्र संसदीय बोर्डाकडून निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणाला पाठिंबा द्यायचा यावर निर्णय होत नाही. ही अपक्षांची लढाई आहे. त्यामुळे आतापर्यंत पाठिंब्यासाठी आमच्याकडे कोणीही आलेले नाही,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा >> शेवटी शोध लागला! नितीन गडकरींना धमकी देणारा आहे कुख्यात गुंड; तुरुंगातून केला फोन

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपाच्या नेत्या शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंब्यासाठी विचारणा केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) शुंभागी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 11:33 IST

संबंधित बातम्या