scorecardresearch

संजय राऊतांकडून कॅसिनोतील ‘तो’ फोटो ट्वीट, बावनकुळे प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी मकाऊ येथे…”

संजय राऊतांनी बावनकुळेंचा फोटो ट्वीट केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपच्या फैरी रंगल्या आहेत.

sanjay raut chandrashekhar bawankule
संजय राऊतांनी कॅसिनोबाबत केलेल्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर फोटो ट्वीट करत गंभीर आरोप केले होते. ‘महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत,’ असं म्हणत संजय राऊतांनी बावनकुळेंना लक्ष्य केलं होतं. याला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

‘एक्स’ अकाउंटवर संजय राऊतांनी म्हटलं, “महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…”

resident doctors, MARD, MP Hemant Patil, protest
खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात मार्डचे आज आंदोलन
Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Sharad Pawar Ajit Pawar Rohit Pawar
“हो आम्ही पाळण्यात आहोत, पण…”, शरद पवारांचा उल्लेख करत रोहित पवारांचं अजित पवार गटाला प्रत्युत्तर, म्हणाले…
uddhav thackeray rahul narvekar eknath shinde
आमदार अपात्रतेबाबत ‘या’ तारखेला प्रत्यक्ष सुनावणी; ठाकरे गट आरोप करत म्हणाला…

“हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत, खेळले तर…”

“१९ नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला होता.

“जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल”

“ते म्हणे.. कुटुंबासह मकाऊ ला गेले आहेत… जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!,” असा सूचक इशाराही राऊतांनी दिला होता.

“ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे”

यावर बावनकुळेंनी ‘एक्स’ अकाउंटवर लिहिलं की, “मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.”

“प्रदेशाध्यक्ष कॅसिनोत जुगार खेळत असतील, तर…”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बावनकुळेंच्या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुसरीकडे, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा फोटो समोर आला आहे. या फोटोचा तपास केला पाहिजे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कॅसिनोत जुगार खेळत असतील, तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrashekhar bawankule reply sanjay raut over macau casino photos ssa

First published on: 20-11-2023 at 15:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×