भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंना करोनाची लागण; नाना पटोलेंविरोधातल्या आंदोलनात सहभागी झाल्याने वाढली चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोलेंच्या विरोधात काल झालेल्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्याची माहिती आज दुपारी मिळाली. त्यानंतर आता भाजपा नेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही करोनाची लागण झाल्याचं आता समोर येत आहे. बावनकुळे यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. दोन तीन दिवसांपूर्वीच नाना पटोले यांच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात बावनकुळे सहभागी झाले असल्याने चिंता वाढली आहे.

बावनकुळे यांनी स्वतः ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये बावनकुळे म्हणतात, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतः ला घरीच विलग केलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार आणि काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. काल झालेल्या या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या वेळी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं, तसंच त्यांचा पुतळाही जाळण्यात आला. यानंतर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं.

हेही वाचा – करोना झाल्याचं कळताच मोदींचा फोन, शरद पवारांची माहिती; म्हणाले “काळजी आणि शुभेच्छा…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही करोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असल्याचं पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करत सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrashekhar bawankule tested positive for covid 19 vsk

Next Story
“आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी