हर्षद कशाळकर

प्रशासकीय सेवांमध्ये रायगड जिल्ह्यातील अधिकारी अभावाने आढळतात. स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शनाचा अभाव यास प्रामुख्याने कारणीभूत ठरतो आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ‘गरुडझेप’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला रायगडकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील अधिकारी विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करत आहेत.

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Prime Minister Narendra Modi going to Address Public Meeting in Chandrapur
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना

कोकणातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये फारसा सहभाग दिसून येत नाही, त्यामुळे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत प्रशासकीय सेवेत कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण नगण्य असते. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शनाचा अभाव यास कारणीभूत ठरतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘गरुडझेप’ उपक्रम सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. यात जिल्ह्यातील अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

अल्पावधीतच हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यातील मुलांना चांगले यश मिळू शकेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला वाटतो आहे.

मोबाइल ॲप

जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहेत. यात अधिकारी दर शनिवारी आणि रविवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावर येणे शक्य होणार नाही त्या विद्यार्थ्यांसाठी गरुडझेप नावाचे मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी सहभागी होऊ शकत आहेत. शनिवार आणि रविवार सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत या विद्यार्थ्यांना अधिकारी मार्गदर्शन करत आहेत.

स्पर्धा परीक्षा केंद्रात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या

उरण- ३३७, पनवेल- १,७३२, खालापूर- ४६६, कर्जत-४९३, पेण- ३२०, अलिबाग-५७०, मुरूड-२५०, रोहा- २५१, सुधागड- ११२, माणगाव- ६६८, तळा- १५९, श्रीवर्धन-२७०, म्हसळा-१३५, महाड-६८०, पोलादपूर- १०६

पेण येथे मध्यवर्ती मार्गदर्शन केंद्र

पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे जिल्ह्याचे मध्यवर्ती मार्गदर्शन केंद्र सुरू झाले आहे. कोविड निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना पेण येथील या केंद्रावर हजर राहणे शक्य नव्हते, म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी ते राहत असणाऱ्या तालुक्यातील तहसीलमध्ये दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग वाढावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन दिले जात आहे. जास्तीत जास्त युवा-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. – डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड