scorecardresearch

अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटुंबावर दबाव आणून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

दबाव टाकण्यासाठी आलेले सर्व राजकीय प्रतिष्ठीत गाव पुढारी असल्याचे बोलले जात आहे.

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

सातारामधील जावली तालुक्यातील नेवरेकर वाडी येथील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या याप्रकरणी संबंधित मुलीच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांचे आमिष देऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गणेश पवार, प्रमोद कांबळे, केशव महामुळकर, अशोक महामुळकर, दिलीप महामुळकर यांच्याविरोधात अतिसंवेदनशील गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच २५ हजार रुपयांचे आमिष दाखवून पीडित कुटुंबीयांना धमकावणे आदी गुन्ह्याखाली या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी बबन उर्फ बबलींग सपकाळ (वय ६५, राहणार नेवेकरवाडी, ता जावली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी सदर आरोपीने संबंधित अल्पवयीन मुलीवर दोन वेळा असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्थानिक पातळीवर संबंधित आरोपीला समज देण्यात आली होती. मात्र ज्यावेळी आरोपीने विकृतीचा कळस गाठला व हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीच्या केलेल्या कृत्याला पाठीशी घालत, २५ हजार रुपयांचे आमिष दाखवत संबंधित कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास दबाव टाकण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी व दबाव टाकण्यासाठी आलेले सर्व राजकीय प्रतिष्ठीत गाव पुढारी असल्याचे बोलले जात आहे. अत्याचाराला महत्त्व न देता आरोपीस वाचवण्यासाठी पुढे आलेल्या गाव पुढाऱ्यांना गुन्हा दाखल झाल्याने चांगलीच अद्दल घडली आहे.

संबंधित सहा गाव पुढारी मेढा पोलीस ठाण्यातच हे प्रकरण मिटवण्यासाठी आले होते. जावली तालुक्यात मागील सहा महिन्यात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर शीतल जाणवे-खराडे यांनी भेट घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 18:59 IST

संबंधित बातम्या