ठाकरेंच्या घरातील सुंदर व्यक्तीमुळे एकाचा खून झाला? निलेश राणेंचं खळबळजनक ट्वीट | chavhan surname man murder for beautiful person in Thackeray family Nilesh Rane tweet rmm 97 | Loksatta

ठाकरेंच्या घरातील सुंदर व्यक्तीमुळे एकाचा खून झाला? निलेश राणेंचं खळबळजनक ट्वीट

ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

ठाकरेंच्या घरातील सुंदर व्यक्तीमुळे एकाचा खून झाला? निलेश राणेंचं खळबळजनक ट्वीट
भाजपा नेते निलेश राणे (संग्रहित फोटो)

भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. शिवाय, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याचं मृत्यू झालेल्या दिवशी कर्जतच्या फार्म हाऊसवर काय झालं होतं? हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे, असंही ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यांचं हे ट्वीट वेगानं व्हायरल होत आहे.

या ट्वीटनंतर निलेश राणेंनी पत्रकारांशी संवाद साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. “ठाकरेंनी आता त्यांची औकात ओळखावी, ते आता शून्य झाले आहेत. त्यांना आता कुत्रंही विचारत नाही. त्यामुळे त्यांनी राणेंच्या नादाला लागायचं नाही. आमच्यावर भुंकायला जे कुत्रे ठेवलेत, त्यांना पण ठाकरेंनी आवरायला सांगितलं पाहिजे. नाहीतर जाहीरसभा घेऊन सर्व गोष्टी बाहेर काढेन, अशा इशारा निलेश राणेंनी दिला आहे.

हेही वाचा- “काम नाही, धाम नाही, घरी जा बायको…” मंत्री चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावलं, VIDEO व्हायरल

निलेश राणे ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाले?
“ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? स्वर्गीय मीनाताई (माँसाहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या त्या कशा गेल्या? कुठल्या परिस्थितीत गेल्या? त्यादिवशी कर्जतच्या फार्म हाऊसवर काय झालं? हेदेखील महाराष्ट्राला एकदा कळालं पाहिजे” अशा आशयाचं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुण्यात ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानाला प्रारंभ, सत्य, प्रेम, अहिंसेच्या मार्गाचा निर्धार

संबंधित बातम्या

VIDEO: भाषण करताना स्टुलवर उभे राहिल्याने मनसेची टीका, सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “माझ्या पायाखाली…”
“…म्हणून शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं”, संजय राऊतांचं मोठं विधान, शिंदे सरकारला केलं लक्ष्य!
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, मग…”; सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
Maharashtra Karnataka Dispute: “कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर…,” एकनाथ खडसेंचं जाहीर आव्हान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: अंघोळ करत होती सौंदर्या, शालीनने चुकून उघडला बाथरुमचा दरवाजा अन्…
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानचं १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप? पोस्टमुळे चर्चेला उधाण
मतभेद बाजूला सारून लाडक्या लेकासाठी मलायका अरबाज आले एकत्र; नेटकरी म्हणाले…
पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना; प्रशासनाकडून आज प्रत्यक्ष पाहणी
अभिनेत्रींना मिळणाऱ्या कमी मानधनाबद्दल प्रियांका चोप्राने व्यक्त केली नाराजी; म्हणाली…