scorecardresearch

Premium

ओबीसी बैठकीत अजित पवारांबरोबर वाद झाला? छगन भुजबळ म्हणाले, “एका घरात…”

ओबीसी आरक्षणानुसार छगन भुजबळांनी बैठकीत आकडेवारी सादर केली. पण…

ajit pawar chhagan bhujbal
अजित पवारांबरोबर झालेल्या वादावर छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी ( २९ सप्टेंबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याचं समोर आलं होतं. यावर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ओबीसी आरक्षणानुसार छगन भुजबळांनी बैठकीत आकडेवारी सादर केली. पण, ही आकडेवारी अजित पवारांना अमान्य होती. यावरूनच दोघांत वाद झाल्याचं सांगण्यात येत होतं. पण, सचिवांना अजित पवारांनी चुकीचं मार्गदर्शन केलं, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

AJit vs SHarad Pawar
Maharashtra News : अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या प्रकरणाचा दाखला, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला
Eknath SHinde (
Maharashtra News : आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं? शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांनी निकाल…”
Mahadev Jankar
“इंडिया आघाडीकडं महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांची मागणी केली, पण…”, जानकरांचं मोठं विधान
uddhav thackeray rahul narvekar eknath shinde
आमदार अपात्रतेबाबत ‘या’ तारखेला प्रत्यक्ष सुनावणी; ठाकरे गट आरोप करत म्हणाला…

हेही वाचा : “यह डर अच्छा है!” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विदेश दौरा रद्द झाल्याच्या वृत्तावर आदित्य ठाकरेंचा टोला

छगन भुजबळ म्हणाले, “अजित पवार यांच्याबरोबर वाद झाला, यात सत्य नाही. पण, एससी, एसटी, ओबीसी यांची माहिती तुमच्याकडं असणार असं अजित पवारांना म्हटलं. त्यावरून थोडी चर्चा झाली. मात्र, पराचा कावळा करण्यात आला. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत.”

हेही वाचा : कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीचं आरोपपत्र दाखल, अधिकाऱ्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटे, बार अन्…

“दलित, ओबीसी, आदिवासी आणि खुल्या प्रवर्गात कशी आणि किती भरती झाली, याची टक्केवारी मांडली होती. पण, अजित पवारांना सचिवांनी चुकीचं मार्गदर्शन केल्यानं ते बोलले. एका घरात दोन भावांत चर्चा होत असते. अशी चर्चा आमच्यात झाली. अंतर्गत लढाई वगैरे आमच्यात नाही,” असं भुजबळांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhagan bhujbal clarification clash between ajit pawar in obc meeting ssa

First published on: 30-09-2023 at 16:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×