chhagan bhujbal clarification on saraswati photo dispute | Loksatta

सरस्वती पूजनावरील वादावर छगन भुजबळांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “महापुरुषांचे फोटो बाजूला…”

सरस्वती पूजावरून राज्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाल्यानंतर या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सरस्वती पूजनावरील वादावर छगन भुजबळांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “महापुरुषांचे फोटो बाजूला…”
संग्रहित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. दरम्यान आता या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा – “एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, पण…”, अशोक चव्हाणांनंतर चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

काय म्हणाले छगन भुजबळ?

“माझ्या वक्तव्याचं राजकारण केलं जात आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी केवळ माझं मत मांडलं होत. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. ज्योतीबा फुलेंनी स्थापन केलेला सत्यसोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम होता. यावेळी बोलताना, आपण शाळेत पहिल्या दिवशी सरस्वतीची पूजा करतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, अण्णसाहेब कर्वे आदी महापूरूषांची पूजा करत नाही. ते आपले देव आहेत. त्यांची पूजा आपण का नाही. या लोकांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली. यावेळी त्यांना विरोध सहन करावा लागला. अशा परिस्थिती ज्यांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडी केली त्यांची पूजा करायची सोडून आपण सरस्वती देवीची पूजा करतो. त्यामुळे देवीच्या जागी महापुरुषांची पूजा करावी एवढं माझ्या म्हणण्याचा उद्देश होता”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

हेही वाचा – शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या “महाराष्ट्राचा एक दौरा…”

“कोणाचे फोटो काढा किंवा लावा, असं मी म्हणालो नव्हतो. मात्र, माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे. मी सुद्धा हिंदू आहे. नाशिकमध्ये अनेक मंदिरांची कामे मी केली आहेत. कुंभमेळाव्यसाठीही आम्ही भरपूर कामे केली आहेत. माझ्या घरातही देवदेवतांची पूजा होते. आम्ही सर्वच देवीच्या दर्शनाला जातो. तुम्ही कुटुंबात कोणत्या देवाची पूजा करता हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, शाळेत शाळेत महापुरुषांचे फोटो बाजूला सारून देवीची पूजा करणं योग्य नाही, एवढचं माझं म्हणणं होतं”, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, पण…”, अशोक चव्हाणांनंतर चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

संबंधित बातम्या

“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्याची जीभ घसरली!
“शिवरायांच्या समाधी स्थळावर जाऊन वेदना मांडणार”, रायगडाकडे निघण्यापूर्वी उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “जर आज मी…”
“शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटाचा खोचक टोला; कवितेतून ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!
Maharashtra News Live : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २६० एड्सचे रुग्ण; इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या, एका क्लिकवर…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
देशात कुठल्या राज्यात सर्वाधिक व सर्वात कमी बेरोजगारी? महाराष्ट्राची स्थिती काय? वाचा…
पुणे: युवक काँग्रेसकडून राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
आई xx दे की रिप्लाय!
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा