संजय राऊत निर्दोष सुटतील का? छगन भुजबळ म्हणाले, "ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि..." | Chhagan Bhujbal comment on ED custody of Sanjay Raut pbs 91 | Loksatta

संजय राऊत निर्दोष सुटतील का? छगन भुजबळ म्हणाले, “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने आणखी वाढ केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत निर्दोष सुटतील का? छगन भुजबळ म्हणाले, “ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि…”
छगन भुजबळ यांची संजय राऊतांच्या ईडी कोठडीवर प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने आणखी वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांना आता ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. ईडीने राऊतांवर गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी कारवाई केलीय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नसल्याचं म्हणत सूचक इशारा दिला आहे. ते गुरुवारी (४ ऑगस्ट) नाशिकमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “संजय राऊतांना मिळालेली ईडीची कोठडी हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे. ईडीने न्यायालयात काही गोष्टी मांडल्या असतील. नेमक्या काय गोष्टी न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या याबाबत मी ऐकलेलं नाही. मात्र, अधिक तपासासाठी न्यायालयाने संजय राऊतांना ईडी कोठडी सुनावली असावी.”

“ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही”

पत्रकारांनी संजय राऊत यांची निर्दोष सुटका होईल का? असा प्रश्न विचारला. यावर भुजबळ म्हणाले, “संजय राऊत निर्दोष सुटतील की नाही याबाबत मला तसं काहीही सांगता येणार नाही. ईडीच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही आणि याची सर्वांना कल्पना आहे. त्यातूनही काही मार्ग निघाला तर आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत.”

संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवार गप्प का?

यावेळी छगन भुजबळांना संजय राऊतांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गप्प का? असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “असं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत ईडीच्या कारवाईवर चर्चा घडवून आणली आहे. त्यात त्यांनी काही गोष्टी मांडल्या.”

हेही वाचा : Photos : संजय राऊतांच्या अटकेनंतर पेढे वाटणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने नेमकं काय म्हटलं? वाचा…

ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्याविषयी देखील त्या बोलल्या. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षांसोबत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते भाष्य करत आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सांगली : अनैतिक संबंधातून कर्नाटकातील तरूणाचा खून

संबंधित बातम्या

“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”
“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं?” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल!
“एक मिनिटात MSMEचा फुलफॉर्म सांगावा, मग…”, नारायण राणेंना राऊतांचे आव्हान
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन…
“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा
पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली
पुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेवर मंगलप्रभात लोढांनी दिलं उत्तर, म्हणाले…