महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. यामुळे राज्यभर आव्हाडांचा निषेध केला जात आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात एल्गार पुकारला. तसंच, पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. आता यावरून अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे. तसंच, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करत महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे काही श्लोक समाविष्ट करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलं. त्यांच्या या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम राबवला. परंतु, हा कार्यक्रम त्यांच्याच अंगलट आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तसंच, सत्ताधाऱ्यांनी त्यांना आता लक्ष्य केलं आहे. यावरून छगन भुजबळ यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ म्हणाले, “जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले. त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे. त्यांनी रागाच्या भरात मनुस्मृती जाळली, त्यांनी ते काय आहे ते पाहिलं नाही. इतरांनीही त्यांचं अनुकरण केलं. हा मूळ मुद्दा होता की मनुस्मृतीचा चंचूप्रवेश शिक्षणात नको. हा फोकस दूर होऊन नुसतं जितेंद्र आव्हाड सुरू झालं”, असं म्हणत छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Narendra modi
“सहा महिन्यांनी मोठा राजकीय भूकंप होणार”, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
devendra Fadnavis
मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार? देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले; “आम्ही..”, आव्हाडांवरही टीका
Chhagan Bhujbal, Jitendra Awhad_FB
राष्ट्रवादीच्या दोन गटांमधला जिव्हाळा कायम? भाजपाची आव्हाडांवर टीका अन् भुजबळांकडून बचाव; आव्हाड म्हणाले, “मी तुमचा….”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Mumbai Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : देवेंद्र फडणवीसांनी घेतलं अयोध्येत भगवान रामाचं दर्शन; म्हणाले, “कारसेवक म्हणून…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा >> आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा

यावेळी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मला काही कळत नाही, मनुस्मृतीतील श्लोक शालेय शिक्षणात अचानक का आणायची गरज आहे? त्यातील दोन श्लोक चांगले आहेत म्हणतात, पण चंचूप्रवेश पाहिजे कशाला? ज्ञानेश्वरांचे श्लोक नाहीयत का? संत तुकारामांचे नाहीयत का? अनेक संतांचे श्लोक आहेत. त्यामुळे त्यांचा चंचूप्रवेश का करायचा? याच्या मागे काय चाललंय हे शोधलं पाहिजे. बहुजन समाजातील दीपक केसरकर त्याची भलामन करतात हे अतिशय दुःखदायक वाटतं”, असं म्हणत त्यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी छगन भुजबळांचे मानले आभार

छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याने जितेंद्र आव्हाडांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, “भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर, आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, मा. छगन भुजबळसाहेब! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे.”

जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

भीमराव बबन साठे (वय ४८, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार, आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३, १५३ (अ), २९५(अ), ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.