Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Winner Candidate List 2026 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने तब्बल ५७ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. त्यापाठोपाठ असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने जवळपास ३३ जागा जिंकण्यात यश मिळवले. दुसरीकडे- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला केवळ १२ जागांवरच समाधान मानावे लागले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सहा जागाच जिंकता आल्या. वंचित बहुजन आघाडीने चार जागांवर दणदणीत विजय मिळवला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळू शकली नाही. त्याउलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा जिंकता आली. यादरम्यान प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (१४ जानेवारी) मतदान घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपा, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट व ठाकरे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली होती. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही एकत्र निवडणूक लढवली. यादरम्यान संभाजीकरांचा कौल नेमका कोणाला असणार त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. त्यानुसार, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून महापालिकेत त्यांचा महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा : ‘मैं मुंबई आकर…’ भाजपा खासदार निशिकांत दुबेंची पोस्ट; ठाकरे बंधूंबाबत काय म्हणाले?

प्रभाग क्रमांक तीन – विजयी उमेदवार

अ) अमित भुईगळ- वंचित बहुजन आघाडी
ब) अफसर खान- वंचित बहुजन आघाडी
क) कुरेशी – वंचित बहुजन आघाडी
ड) करुणा वाघमारे – वंचित बहुजन आघाडी

प्रभाग क्रमांक आठ – विजयी उमेदवार

अ) भारती सोनवणे – भारतीय जनता पक्ष
ब) रामदास हरणे- भारतीय जनता पक्ष
क) मोहिनी गायकवाड – भारतीय जनता पक्ष
ड) विजय अवताडे – भारतीय जनता पक्ष

प्रभाग क्रमांक नऊ – विजयी उमेदवार

अ) काकासाहेब काकडे – एआयएमआयएम
ब) शाहीन पटेल – एआयएमआयएम
क) सादिया खान – एआयएमआयएम
ड) शेख मतीन माजीद – एआयएमआयएम

प्रभाग क्रमांक १० – विजयी उमेदवार

अ) सुरेखा सानप – भारतीय जनता पक्ष
ब) अर्चना चौधरी – भारतीय जनता पक्ष
क) गणेश नावंदर – भारतीय जनता पक्ष
ड) शिवाजी दांडगे – भारतीय जनता पक्ष

प्रभाग क्रमांक ११ – विजयी उमेदवार

अ) विश्वनाथ स्वामी – भारतीय जनता पक्ष
ब) माधुरी देशमुख – भारतीय जनता पक्ष
क) मीना खरात -भारतीय जनता पक्ष
ड) निकाल अद्याप समोर आलेला नाही.

प्रभाग क्रमांक १५ – विजयी उमेदवार

अ) सचिन खैरे – शिवसेना ठाकरे गट
ब) तरन्नूम अकील अहमद – एआयएमआयएम
क) नूरजाह इकबाल – एआयएमआयएम
ड) ऋषिकेश जैस्वाल – शिवसेना शिंदे गट

प्रभाग क्रमांक १६ – विजयी उमेदवार

अ) संगीता नितीन सांगळे – भारतीय जनता पक्ष
ब) राजू वाडेकर – भारतीय जनता पक्ष
क) आशा भालेराव – भारतीय जनता पक्ष
ड) रामेश्वर भादवे – भारतीय जनता पक्ष

प्रभाग क्रमांक १७ – विजयी उमेदवार

अ) सीमा साळवे – भारतीय जनता पक्ष
ब) अनिल मकरिये – भारतीय जनता पक्ष
क) कीर्ती शिंदे – भारतीय जनता पक्ष
ड) समीर राजूरकर – भारतीय जनता पक्ष

हेही वाचा : लातूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, भाजपा-शिंदे गटाचा दारुण पराभव; महापालिकेतील सत्ता गमावली

प्रभाग क्रमांक १८ – विजयी उमेदवार

अ) हर्षदा शिरसाट – शिवसेना शिंदे गट
ब) अभिजीत जीवनमाल – शिवसेना शिंदे गट
क) छाया वाघचौरे – शिवसेना शिंदे गट
ड) राजू राजपूत – शिवसेना शिंदे गट

प्रभाग क्रमांक १९ – विजयी उमेदवार

अ) चंद्रकांत हिवराळे – भारतीय जनता पक्ष
ब) शिल्परणी वाडकर – भारतीय जनता पक्ष
क) सतिंदर ओबेराय – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
ड) सुजाता गायकवाड – शिवसेना ठाकरे गट

प्रभाग क्रमांक २१ – विजयी उमेदवार

अ) नंदलाल गवळी – भारतीय जनता पक्ष
ब) कमल थोरात – भारतीय जनता पक्ष
क) सुमित्रा मात्रे – भारतीय जनता पक्ष
ड) सुरेंद्र कुलकर्णी – भारतीय जनता पक्ष

प्रभाग क्रमांक २२ – विजयी उमेदवार

अ) पुष्पा निरपगारे – भारतीय जनता पक्ष
ब) अशोक दामले – भारतीय जनता पक्ष
क) यशोदा शेळके – शिवसेना शिंदे गट
ड) राजेंद्र जंजाळ – शिवसेना शिंदे गट

प्रभाग क्रमांक २३ – विजयी उमेदवार

अ) सुरेखा गायकवाड – भारतीय जनता पक्ष
ब) बाळासाहेब मुंढे – शिवसेना शिंदे गट
क) सत्यभामा दामू आण्णा – शिवसेना शिंदे गट
ड) प्रमोद राठोड – भारतीय जनता पक्ष

आणखी वाचा : पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव; सोनाली आंदेकर यांचा तुरुंगातून विजय

प्रभाग क्रमांक २४ – विजयी उमेदवार

अ) गंगुबाई भवरे (कुचे) – भारतीय जनता पक्ष
ब) कमळाबाई नरवडे – भारतीय जनता पक्ष
क) सुनील जगताप – भारतीय जनता पक्ष
ड) किसन ठुबे – भारतीय जनता पक्ष

प्रभाग क्रमांक २५ – विजयी उमेदवार

अ) मनोज गंगावे – भारतीय जनता पक्ष
ब) वैशाली कोरडे – शिवसेना ठाकरे गट
क) प्रियांका खोतकर – भारतीय जनता पक्ष
ड) रवी कावडे – भारतीय जनता पक्ष

प्रभाग क्रमांक २७ – विजयी उमेदवार

अ) दया गायकवाड – भारतीय जनता पक्ष
ब) गोविंद केंद्रे – भारतीय जनता पक्ष
क) सुनीता साळुंके – भारतीय जनता पक्ष
ड) रेणुकादास वैद्य – भारतीय जनता पक्ष

प्रभाग क्रमांक २९ – विजयी उमेदवार

अ) सिध्दांत शिरसाट – शिवसेना शिंदे गट
ब) अनिता घोडेले – शिवसेना शिंदे गट
क) श्वेता त्रिवेदी – शिवसेना शिंदे गट

इतर प्रभागांमधील विजयी उमेदवारांची यादी अद्याप समोर आलेली नाही. परंतु बहुतांश प्रभागात भारतीय जनता पक्ष व एमआयएमचे उमेदवार विजयी झाल्याचे पाहायला मिळत आहे.