Chhatrapati Sambhajinagar ZP Election Winner List 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या ६३ आणि पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. सोमवारी हाती आलेल्या कलांमध्ये भाजपासह शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळाले. शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात भाजपाचा प्रभाव वाढताना दिसून आला. भाजपाने जिल्हा परिषदेच्या ६३ पैकी सर्वाधिक २३ जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने २० जागांवर विजय मिळवला, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नऊ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. त्याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर यश मिळवले. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. महापालिका निवडणुकीत ३३ जागा जिंकणाऱ्या एमआयएमला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भाजपा आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्यास ठाकरे गट किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे. यादरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे.

सोयगाव जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी

फर्दापूर गट – मुलतानी माहिन इद्रिस (भाजपा)
आमखेडा गट – पुष्पाबाई काळे (भाजपा)
गोंदेगाव गट – सुनीता चव्हाण (ठाकरे गट)

सिल्लोड तालुक्यातील विजयी उमेदवारांची यादी

अजिंठा गट – आयेशा बेगम नासेरहुसेन (शिंदे गट)
शिवना गट – निकिता राजेंद्र काळे (शिंदे गट)
उंडणगाव गट – सचिन वाघ (भाजपा)
अंभई गट – अब्दुल आमेर अब्दुल सत्तार (शिंदे गट)
घाटनांद्रा गट – आशा गाढे (शिंदे गट)
डोंगरगाव गट – देविदास पालोदकर (शिंदे गट)
भराडी गट – राधाकृष्ण काकडे (भाजपा)
अंधारी गट – मंगल तायडे (शिंदे गट)
केन्हाळा गट – अनिता मोठे (भाजपा)

आणखी वाचा : भाजपाचा उमेदवार अवघ्या दोन मतांनी पराभूत; लातूरमध्ये जाऊबाईंच्या लढतीत कोण जिंकलं?

फुलंब्री तालुक्यातील विजयी उमेदवारांची यादी

बाबरा गट – जितेंद्र जयस्वाल (भाजपा)
वडोद बाजार गट – गोपाळ वाघ (भाजपा)
पाल गट – गीतांजली पाथ्रीकर (राष्ट्रवादी शरद पवार)
गणोरी गट – निखिल चव्हाण (भाजपा)

खुलताबाद तालुक्यातील विजयी उमेदवारांची यादी

बाजारसावंगी गट – प्रतीक्षा कापसे (भाजपा)
गदाना गट – रेखा चव्हाण (भाजपा)
वेरूळ गट – कुणाल दांडगे (भाजपा)

कन्नड तालुक्यातील विजयी उमेदवारांची यादी

नागद गट – तृप्ती राजपूत (काँग्रेस)
करंजखेडा गट – अर्जुन पाटील (राष्ट्रवादी अजित पवार)
चिंचोली लिंबाजी गट – रावसाहेब पवार (शिंदे गट)
पिशोर गट – केतन काजे (ठाकरे गट)
कुंजखेडा गट – सुनंदा चव्हाण (ठाकरे गट)
हतनूर गट – मीनाक्षी पवार (भाजपा)
जेहूर गट – मंजुषा मलदोडे (भाजपा)
देवगाव रंगारी गट – डॉ. संजय गव्हाणे (भाजपा)

वैजापूर तालुका विजयी उमेदवार यादी

वाकला गट- पार्वतीबाई जाधव (अपक्ष)
बोरसर गट – कल्याण गायके (ठाकरे गट)
शिऊर गट – संजय निकम – (ठाकरे गट)
सवंदगाव गट – निताताई राजपूत (शिंदे गट)
लासूरगाव गट – संगीता तांबे (शिंदे गट)
घायगाव गट – श्रीराम गायकवाड (शिंदे गट)
वांजरगाव गट – पंकज ठोंबरे (राष्ट्रवादी अजित पवार)
महालगाव गट – अविनाश गलांडे (भाजपा)

गंगापूर तालुक्यातील विजयी उमेदवार

सावंगी गट संगीता अमराव (भाजपा)
आंबेलोहळ गट – रतन बत्तीसे (भाजपा)
रांजणगाव गट – अमोल लोहकरे (भाजपा)
वाळूज बुद्रुक गट. – बालाजी सोनटक्के (राष्ट्रवादी अजित पवार)
तुर्काबाद गट – स्वाती पाटेकर (शिंदे गट)
शिल्लेगाव गट – सविता जाधव (भाजपा)
नेवरगाव गट – वैजयंती शिरसाठ – (राष्ट्रवादी अजित पवार)
जामगाव गट – दीपा मुंदडा (अपक्ष)
शेंदूरवादा गट – कृष्णा साहेबराव पाटील (ठाकरे गट)

पैठण तालुका विजयी उमेदवार यादी

पिंप्री बुद्रुक – जयश्री पवार (भाजपा)
चितेगाव गट – कृष्णा गिधाने – (शिंदे गट)
बिडकीन गट – मनोज पेरे – (ठाकरे गट)
आडूळ बुद्रुक गट – रुपाली तवार (शिंदे गट)
पाचोड बुद्रुक गट. – शिवराज भूमरे (शिंदे गट)
दावरवाडी गट – जयश्री वाघमोडे (शिंदे गट)
ढोरकिन गट – राधिका जगताप (शिंदे गट)
पिंपळवाडी गट – कारभारी लोहकरे (शिंदे गट)
विहामांडवा गट – नितीन तांबे (शिंदे गट)
नवगाव गट – पांडुरंग औटे (शिंदे गट)

संभाजीनगर शहर विजयी उमेदवार यादी

लाडसावंगी गट – राधाकिशन पठाडे (शिंदे गट)
गोलटगाव गट – ज्योती शिंदे (अपक्ष)
करमाड गट- साधना कुलकर्णी (भाजपा)
सावंगी गट- अजिनाथ धामणे (भाजपा)
दौलताबाद गट – लंकाबाई जाधव (भाजपा)
वडगाव कोल्हाटी उत्तरपूर्व गट – ललिता सोनवणे (ठाकरे गट)
वडगाव कोल्हाटी मध्यपश्चिम गट – सचिन गरड (भाजपा पुरस्कृत अपक्ष)
पंढरपूर वडगाव कोल्हाटी – विद्या गायकवाड (ठाकरे गट)
आडगाव बुद्रुक गट – विजय घोडके (शिंदे गट)

हेही वाचा : Sindhudurg ZP Results : मंत्री नितेश राणे यांचा बंडखोरांना इशारा; अपक्षांना रसद पुरवणारी अदृश्य शक्ती कोण?

पंचायत समितीतील विजयी उमेदवारांची यादी

अजिंठा गण – समी चाऊस (शिंदे गट)

शिवणा गण – शेख सलीम (शिंदे गट)

उंडणगाव गण – अनिता सुरेश बनकर (भाजपा)

पानवडोद गण – नेहा सुमित खरात (भाजपा)

फर्दापूर गण – राहुल राठोड (भाजपा)

सावळदबारा गण – उत्तम चव्हाण (भाजपा)

केळगाव गण – तुळशा कोठाळे (भाजपा)

अंभई गण – रजनीताई नगरे (भाजपा)

हळदा गण – कासाबाई पांडुरंग गवळे (भाजपा)

घाटनांद्रा गण – सोफिया इब्राहिम (शिंदे गट)

आमठाणा गण – रघुनाथ मोरे (शिंदे गट)