किल्ले प्रतापगडावरील अफजलखान कबर परिसरातील अतिक्रमण हटविले त्याच पद्धतीने राज्यातील गडकोटांवर आणि किल्ल्यांवर करण्यात आलेली अतिक्रमणे माहिती घेऊन तातडीने हटविण्यात येतील.गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रतादिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले.

किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा,पालकमंत्री शंभूराज देसाई, , खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार छत्रपती शिवेद्रंराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे,,महादेव जानकर, भरत गोगावले कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण मुख्यमंत्र्यांनी केले. भवानी मातेची आरती केली. छत्रपतींची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्पण केला.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
Shirpur sub-divisional officer
शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आज ही प्रेरणा देणारे स्त्रोत असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेश द्वार स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठया उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तात्काळ दिला जाईल. अफजलखान कबर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे आणि दैवतीकरण थांबविले आहे त्यामुळे राज्यात सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे आणि त्यामुळेच आजचा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यास धरतीवर राज्यातील गडकोटांवर आणि किल्ल्यांवर झालेली अतिक्रमणे माहिती घेऊन हटविण्यात येणार आहेत.

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि मुख्य शेतकऱ्यांचा मुलगा हेलिकॉप्टरने शेती करायला का नाही जाऊ शकत अडीच वर्षे हात बांधून बसलेले आणि आम्हाला काही शिकू नये आम्ही त्यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही आम्ही कामातूनच त्यांना योग्य ते उत्तर देऊ असेही मुख्यमंत्री म्हणाले मंगलप्रभात लोढा म्हणाले प्रतापगडावर शिवप्रतापाचे शिल्प उभारले जाईल लोकांना सर्वतो इतिहास समजेल याची काळजी सरकार घेईल ज्यांनी ज्यांनी नाकावर टिचून गडकोटांवर अतिक्रमण केले आहे ते समोर हटविले जाईल ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आग्र्याचा वेळा तोडून हिंदवी स्वराज्यासाठी स्थापनेसाठी बाहेर आले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेकदा आडविले जात होते परंतु ते सुद्धा हिंदवी स्वराज्याच्या पुनर स्थापनेसाठी बाहेर आले आहेत यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदींची भाषण झाली प्रतापगडावरील अतिक्रमण हटविण्यामध्ये खंबीर भूमिका पार पडल्याबद्दल व संवेदनशील विषय योग्य प्रकारे हाताळल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लेझीम- तुताऱ्या, ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला. मर्दानी खेळात तल्लख असलेल्या विद्यार्थ्यांनी लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिके करुन उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण प्रतापगड परिसर आज भगवेभाई झाला होता आणि सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू होता.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रास्ताविक केले.आमदार महेश शिंदे यांनी आभार मानले.