मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होईल का? असा प्रश्न जेव्हा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण? हे त्यांच्या लक्षात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. एवढंच नाही तर आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो मंत्रिमंडळात काय मिळणार हे माहित नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ

पेट्रोल दर १०० रुपये प्रति लिटर होण्याची वाट बघतोय

याच पत्रकार परिषदेत त्यांना पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांबाबतही विचारणा करण्यात आली. त्यावेळी गुलाबराव पाटील म्हटले, पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटर होण्याची वाट बघतो आहे. सरकारने लोकांची मानसिकताच अशी करून टाकली आहे. पेट्रोलचे दरच नाही बदलले तर पंपावर असलेले पोस्टरही बदलले. पूर्वी एक म्हातारीबाई होती आता तिथे एक मॉडेल आली आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेतच असेही पाटील यांनी म्हटले आहे. लोक वाढत्या दरांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तरीही प्रतिक्रिया मतपेटीत टाकत नाहीत. कारण लोकांनी कितीही संताप व्यक्त केला तरीही सत्ता भाजपाचीच येते आहे. लोकांच्या हाती मतरुपी शस्त्र आहे ते पुढील निवडणुकांमध्ये त्यांनी वापरावे असाही उपरोधिक सल्ला पाटील यांनी दिला.

शिवसेना आणि भाजपा सत्तेत नव्हते त्यावेळी जर पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर आंदोलने करायचे. आता फक्त शिवसेना आंदोलन करत आहे. इतर राज्ये जर भार उचलत असतील तर महाराष्ट्र सरकारनेही भार उचलला पाहिजे असाही सल्ला पाटील यांनी दिला.