वाई:मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन… | Chief Minister Shinde called Udayanraje bhosle from Pratapgarh event venue amy 95 | Loksatta

मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन…

राज्यपालांच्या वक्तव्याबाबत उदयनराजे यांची नाराजी व्यक्त

मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन…
खासदार उदयनराजे भोसले

वाई: राज्यपालांवरील कारवाईबाबत उदयनराजे ठाम असून मुख्यमंत्र्यांनी फोन करुनही प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाला हजर राहून तर राज्य सरकार बद्दल नाराजी व्यक्त केली .आज प्रतापगडावर आयोजित राज्य सरकारच्या वतीने आयोजित शिवप्रताप दिनाच्या सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले सहभागी झाले नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम रहात प्रतापगडावरच्या सोहळ्याला गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केली.

कार्यक्रमाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते मात्र उदयनराजे अनुपस्थित होते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणावरून उदयनराजेंनी फोन करून आपण सोहळ्याला का आला नाहीत याबाबत विचारणा केली. त्यावर उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याचे समजते. उदयनराजे राज्यपाल कोश्यारीना हटवण्यावर ठाम असल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 22:08 IST
Next Story
“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा