शिबिरातून पोहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी वारणानगर येथे उघडकीस आला. वरुण वसंत मोरे (रा. बिरदेवनगर, जुने पारगांव) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या प्रकारामुळे संतप्त जमावाकडून जलतरण तलावाची नासधूस करण्याबरोबरच शिबिर चालक उदय पाटील यास बेदम मारहाण केली. याबाबत कोडोली पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.
कराटे प्रशिक्षक उदय पाटील यांनी उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. याअंतर्गत त्याने शिबिराला आलेल्या ३२ विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी वारणा शिक्षण मंडळाच्या जलतरण तलावात नेले होते. रात्री सर्व विद्यार्थी शिबिरात पोहोचले पण एक जण कमी असल्याचे लक्षात आले. त्यावर गुरुवारी शोध मोहीम सुरू केली. जलतरण तलावात वरुणचा मृतदेह आढळून आला. 

 कराड, पाटणतालुक्यात

वादळीपावसाने मोठी हानी

कराड, वार्ताहर

कमालीच्याउष्म्यानेजनजीवन हैराण असताना काल बुधवारी कराड व पाटण तालुक्यातील ठिकठिकाणीवादळी पावसाचा तडाखा बसला. त्यात गोसावीवाडी (ता. कराड) येथील गणपत खाशाबा जाधव हे जखमी झाले. तर, कवठेव उंब्रज महसूल मंडलात ९७ घरांचे पत्रेउडून जाणे, भिंतीकोसळणे, कच्च्याभिंतींची घरे जमीनदोस्त होणे असे प्रकारघडून सुमारे ३० लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती कराडचे प्रभारीतहसीलदार बी.एम. गायकवाड यांनी दिली. 

वादळीपावसात दोन हेक्टर३० आर क्षेत्रातील आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र,उसाचेपीक असल्यानेशेतीचे नुकसान झाले नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाटणतालुक्यातील ढेबेवाडी विभागात मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले असून, एकंदरनुकसानीचाआकडा कोटीच्या घरात असल्याचे चित्र आहे. या पावसात ६ जण जखमी झाले असून, झाडे, विजेचेखांब उन्मळून पडल्याने कराड चिपळूण मार्ग काहीकाळ बंद राहिला. तर, कराडतालुक्यातील कोरेगावसह काही ठिकाणची वाहतूक खोळंबली होती.

दरम्यान, उष्म्याचाकहर कायम असून, आजसायंकाळीही ढग दाटून आले. मात्र, पावसाचालवलेशही नव्हता. परिणामी, कराडव पाटण शहराला पावसाची सातत्यानेहुलकावणी मिळत आहे. अशातच कोयना, धोमबलकवडीसह सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठा चिंताजनक आहे. छोटय़ा प्रकल्पात पाण्याचा खडखडाट असून, उन्हाचीदाहकता, आणिपाणी टंचाईमुळे कोयना जलविद्युत प्रकल्पासहठिकठिकाणच्या वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.पिण्यासाठीपाण्याची गरज ओळखून वीजनिर्मिती व शेतीच्या पाणी वापरावर र्निबध येण्याचीशक्यता बळावली आहे.