Chitale Dairy Nitin Gadkari, Chitale Dairy Gadkari sangli, चितळे डेअरी सांगली गडकरी, चितळे डेअरी सांगली | Loksatta

आधुनिकतेतून चितळे डेअरीने केली धवल क्रांती – नितीन गडकरी

आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या साथीने चितळे डेअरीने देशात धवल क्रांती केली असल्याचे प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Chitale Dairy Nitin Gadkari
आधुनिकतेतून चितळे डेअरीने केली धवल क्रांती, नितीन गडकरींचे प्रतिपादन (image – लोकसत्ता टीम)

सांगली : भविष्याचा वेध घेत, आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या साथीने चितळे डेअरीने देशात धवल क्रांती केली असल्याचे प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भिलवडी स्टेशन (ता.पलूस) येथे भारतातील अद्ययावत चितळे डेअरी आणि जगातील सर्वात मोठ्या जेनेटिक संस्थेच्या (ए. बी. एस. जीनस) संयुक्त विद्यमाने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात आलेल्या सेक्सेल सिमेन जेनेटिक प्रयोगशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते खा. शरद पवार होते.

केंद्रिय मंत्री गडकरी म्हणाले, शेतीला दर्जेदार बियाणे व कलमे तशी दूध वाढीसाठी देशभर दर्जेदार सिमेन उपलब्ध करून द्यावे लागेल. कमी खर्चात जादा प्रोटीन देणार्‍या गवताची निर्मिती करावी लागेल. दुधाचे उत्पादन वाढले तरी उत्पादन खर्च कमी कसा होईल, या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. चितळे डेअरीने काळाची पावले ओळखून २१ व्या शतकात देशातील दुग्ध व्यवसाय समृद्ध करण्याचे पाऊल टाकले आहे. या उपक्रमासाठी भविष्यात भारत सरकारकडून चितळे डेअरीस लागेल ती मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा – सोलापूरजवळ उड्डाणपुलावरून कोसळून १३ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू

हेही वाचा – बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे, धक्कातंत्र कोणी शिकवलं? एकनाथ शिंदेंनी दिलं खास उत्तर; म्हणाले, “खरा धक्का…”

शरद पवार म्हणाले, आधुनिकता, दूरदृष्टी, प्रयोगशिलता, कमी उत्पादन खर्चात जादा उत्पादन घेण्याची नवी दृष्टी चितळे परिवाराने भारतीय कृषी क्षेत्रात निर्माण केली. जी.एम.बियाणांचा वापर केल्यास देश अन्नधान्य उत्पादनात समृद्ध बनेल. यावेळी नानासाहेब चितळे, विडास चितळे, श्रीपाद चितळे, अनंत चितळे, गिरीश चितळे, मकरंद चितळे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे , खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम, सुधीर गाडगीळ, मोहनराव कदम, सुमनताई पाटील, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, अरुण लाड आदी उपस्थित होते.
विश्वास चितळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, दिनेश रावत यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 20:39 IST
Next Story
बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे, धक्कातंत्र कोणी शिकवलं? एकनाथ शिंदेंनी दिलं खास उत्तर; म्हणाले, “खरा धक्का…”