मुंबई : मराठी चित्रपट जगतात गेल्या वर्षीपासून आर्कषणाचा केंद्रबिंदू ठरलेला राज्य शासनाचा ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

गेल्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या महोत्सवाला चित्रपट रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा चार दिवसांचा हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचे निर्देश ॲड.शेलार यांनी दिले.

या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपस्थित होते.