सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत हे विरोधकांना भेटणार नाहीत. सूर्य कांत ही भेट नाकारण्याचं कारण गोपनीय ठेवत ही भेट नाकारली आहे. ज्यानंतर त्यांच्यावर टीका केली जाते आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश सूर्य कांत यांची भूमिका योग्यच आहे, कुठले सरन्यायाधीश आंदोलकांना आणि मोर्चेकऱ्यांना भेटतात असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विरोधक संविधानाची भाषा करत आहेत. हे कुठल्या संविधानात लिहिलं आहे की देशाचे सरन्यायाधीश आंदोलकांना भेटतात? सर्वोच्च न्यायालय जे म्हणालं ते योग्य आहे तुम्ही कोर्टात या तिथे लढता येईल. मी कायमच सांगत आलोय की हे सगळे संविधान विरोधी लोक आहेत. सरन्यायाधीशांनी संवैधानिक अधिकारांच्या आधारेच हे सांगितलं आहे की मी यांना भेटू शकत नाही. त्यानंतर हे लोक सरन्यायाधीशांना शिव्या देत आहेत. ही कुठली पद्धत आहे? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांसह काँग्रेस थेट सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढणार आहे. मात्र, एकीकडे मोर्चासाठी विरोधक सज्ज होत असतानाच दुसरीकडे सरन्यायाधीशांनी यासंदर्भात विरोधकांना भेटण्यासाठी नकार दिला आहे. एका इमेलमध्ये सरन्यायाधीशांनी भेटीसाठी नकार देण्याची कारणं कळवल्याचं एएनआयनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
इंडिया आघाडीचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयावर जाणार आहे. राहुल गांधी सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट मागितली होती. आज संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान ते भेटणार असं ठरलं होतं. पण राजकीय नेत्यांना भेटण्याचा आपल्याला अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका जेव्हा देशातल्या नागरिकांना धक्का बसला आहे. प्रत्येक संविधानिक संस्थेवर मोदी आणि अमित शाह यांनी त्यांची माणसं बसवलं आहे. यामुळे शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना भेटणार असतो तेव्हा तेदेखील चर्चेचा दरवाजा बंद करत आहेत. हे या देशाचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
