CJP Andolan Mumbai : केंद्रीय निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आज (२ ऑक्टोबर) सीजेपीच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जेलभरो आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. दुसरीकडे ‘सीजेपी’च्या या जेलभरो आंदोलनाविरोधात झेन नेक्स्टचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मुंबईत चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

‘सीजेपी’च्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे हे आंदोलन होणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ‘सीजेपी’चं हे आंदोलन सुरू झालं आहे. दरम्यान, ‘सीजेपी’च्या आंदोलनासह सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

CJP Protest Live Updates : ‘सीजेपी’च्या आंदोलनासह सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

20:16 (IST) 2 Oct 2026

"फेक नरेटिव्हचा...", सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज (२ ऑक्टोबर) मुंबईत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मी याआधीही सांगितलं आहे की आता सर्व पर्दाफाश झालेला आहे. यांचा फेक नरेटिव्ह पुढे पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यामध्ये त्यांना कधीही यश मिळणार नाही", अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली.

20:08 (IST) 2 Oct 2026

"मेलोडी चॉकलेट्स खा, पण…"; अभिजीत दिपकेंची CJP च्या आंदोलनातून पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष टीका

अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...सविस्तर बातमी
19:24 (IST) 2 Oct 2026

मुंबईतील 'सीजेपी'चं आंदोलन संपलं; दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा दिला इशारा

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीच्यावतीने आज जेलभरो आंदोलन करण्यात आलं असून सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा द्या अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. आजचं मुंबईतील 'सीजेपी'चं आंदोलन संपलं असून आता दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

18:45 (IST) 2 Oct 2026
'सीजेपी'च्या आंदोलनात शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी सहभागी; ज्ञानेश कुमारांच्या विरोधात घोषणाबाजी

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन पार पडलं आहे. या आंदोलनात अनेक कलाकार देखील सहभागी झाले आहेत. शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी यांच्यासह आदींनी या आंदोलनात हजेरी लावली. यावेळी ज्ञानेश कुमार राजीनामा द्या अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

https://twitter.com/ANI/status/2105995646633472460

18:32 (IST) 2 Oct 2026

"तुमच्या खुर्चीचा एक पाय फेव्हिकॉलचा, तर दुसरा…"; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना मोठा इशारा

अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...सविस्तर वाचा
18:24 (IST) 2 Oct 2026
'ज्ञानेश कुमार राजीनामा द्या'; मुंबईत 'सीजेपी'च्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीच्यावतीने आज जेलभरो आंदोलन करण्यात आलं असून सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा द्या अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

https://twitter.com/ANI/status/2105995964335215010

17:57 (IST) 2 Oct 2026
शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेक कलाकार देखील सहभागी झाले आहेत. शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी यांच्यासह आदींनी या आंदोलनात हजेरी लावली.

https://twitter.com/ANI/status/2105995964335215010

17:50 (IST) 2 Oct 2026

मुंबईत 'सीजेपी'च्या आंदोलनात शबाना आझमी सहभागी; म्हणाल्या...

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेक कलाकार देखील सहभागी झाले आहेत. शबाना आझमी या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. यावेळी बोलताना शबाना आझमी म्हणाल्या की, आपलं मत हा आपला अधिकार आहे. आपल्या संविधानाने हा अधिकार दिलेला आहे, असं म्हणत शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

17:41 (IST) 2 Oct 2026

अभिजीत दिपके बोलत असताना माईक बंद पडला, आंदोलकांची घोषणाबाजी

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अभिजीत दिपके बोलत असताना अचानक माईक बंद पडला. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

17:32 (IST) 2 Oct 2026

'सीजेपी'च्या विरोधात मंत्रालयाच्या बाजूला 'झेन नेक्स्ट'चं आंदोलन; मुंबईत राजकीय वातावरण तापलं

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनात बोलताना अभिजीत दिपके यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे 'सीजेपी'च्या विरोधात मंत्रालयाच्या बाजूला 'झेन नेक्स्ट'चं आंदोलन सुरू असून अभिजीत दिपके यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

17:28 (IST) 2 Oct 2026

'मी पुन्हा येईन' म्हणत अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा डिवचलं; दिला 'हा' मोठा इशारा

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनात बोलताना अभिजीत दिपके यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 'मी पुन्हा येईन' म्हणत अभिजीत दिपके यांनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.

17:25 (IST) 2 Oct 2026

अभिजीत दिपके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात बोलताना अभिजीत दिपके यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

17:24 (IST) 2 Oct 2026

अभिजीत दिपके यांनी केलं मुंबई पोलिसांचं कौतुक

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात बोलताना अभिजीत दिपके यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना अभिजीत दिपके यांनी मुंबई पोलिसांचं जोरदार कौतुक केलं. मुंबई पोलीस कुचुपुचु आहेत असं म्हणत दिपके यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे.

17:20 (IST) 2 Oct 2026

अभिजीत दिपके यांची पंतप्रधान मोदींवर टीका

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात बोलताना अभिजीत दिपके यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अभिजीत दिपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

17:16 (IST) 2 Oct 2026

अभिजीत दिपके यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. अभिजीत दिपके आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी ज्ञानेश कुमारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी बोलताना अभिजीत दिपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

17:14 (IST) 2 Oct 2026

मुंबईतील CJP च्या आंदोलनात विशाल ददलानी सहभागी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. अभिजीत दिपके आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी ज्ञानेश कुमारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. या आंदोलनात गायक आणि संगीतकार विशाल ददलानी देखील सहभागी झाले आहेत.

17:05 (IST) 2 Oct 2026
नसीरुद्दीन शाह CJP च्या आंदोलनात सहभागी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मुंबईतील आझाद मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली.

https://twitter.com/abhijeet_dipke/status/2105966451786203577

17:02 (IST) 2 Oct 2026

ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं मुंबईत आंदोलन सुरू; शिवाजी पार्कवर मोठी गर्दी अन् घोषणाबाजी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. अभिजीत दिपके आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी ज्ञानेश कुमारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

16:58 (IST) 2 Oct 2026
शिवाजी पार्कवरील CJP च्या आंदोलनाला स्थानिकांचा विरोध होताच जावेद अख्तर भडकले; "राजकीय सभांनाही..."

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात दादरच्या शिवाजी पार्कवर आंदोलन सुरू आहे. मात्र, गोंगाट व ध्वनीप्रदूषणाचे कारण देत स्थानिक रहिवाशांनी आंदोलन रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. यावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टोला लगावला आहे. 'राजकीय पक्षांचे मेळावे होतानाही हेच रहिवासी असाच आक्षेप घेतील याची मला पूर्ण खात्री आहे,' अशी तिक्रिया जावेद अख्तर यांनी दिली.

"मला खूप आनंद आहे की शिवाजी पार्क परिसरातील काही रहिवासी ध्वनी प्रदूषणाबाबत संवेदनशील होत आहेत आणि त्यांनी शिवाजी पार्कवर आज होणारे CJP चे आंदोलन रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मला याची शंभर टक्के खात्री आहे की, भविष्यात जेव्हा कधी महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचा एखादा कार्यक्रम शिवाजी पार्कवर आयोजित केला जाईल, तेव्हाही हेच रहिवासी तितक्याच किंवा त्याहून अधिक तीव्रतेने असाच आक्षेप घेतील", असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/Javedakhtarjadu/status/2105915149249118588

16:41 (IST) 2 Oct 2026

मुंबईतील आंदोलनादरम्यान कोणाला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्यास कायदेशीर टीम सज्ज, सीजेपीची पोस्ट चर्चेत

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान जर कोणाला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं गेलं तर त्यासाठी कायदेशीर टीम सज्ज असल्याचं सांगत त्यांच्याची संपर्क साधण्याचं आवाहन सीजेपीने केलं आहे. "जर आजच्या आंदोलनादरम्यान तुम्हाला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं गेलं, तर कृपया खाली दिलेल्या संपर्कांवर संपर्क साधा", असं आवाहन सीजेपीने केलं आहे.

https://twitter.com/Cockroachisback/status/2105950669773611137

16:17 (IST) 2 Oct 2026

'सीजेपी'च्या जेलभरो आंदोलनाविरोधात झेन नेक्स्टचं आंदोलन; मुंबईत राजकीय वातावरण तापलं

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आज (२ ऑक्टोबर) सीजेपीच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जेलभरो आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाच्या विरोधात दुसरीकडे मुंबईतच 'जेन नेक्स्ट'च्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे.

16:08 (IST) 2 Oct 2026

दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन!; माजी मुख्यमंत्री आतिशी, योगेंद्र यादवांसह ५०० जण पोलिसांच्या ताब्यात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काही निर्णय मनमानीपणे घेतल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाविरोधातील दिल्लीतील निदर्शनांदरम्यान दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, तसेच कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि नेहा बोरा यांच्यासह ५०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

15:28 (IST) 2 Oct 2026

CJP चे प्रवक्ते सौरव दास आंदोलनस्थळी दाखल

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आज (२ ऑक्टोबर) सीजेपीच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.

15:06 (IST) 2 Oct 2026

Video: जंतर-मंतरवर गोंधळ! निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झालेले आप नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेणाऱ्या विविध संघटना व राजकीय पक्षांच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेत संपूर्ण परिसर मोकळा केला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आम आदमी पार्टीचे (AAP) दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा

15:00 (IST) 2 Oct 2026
मुंबईत 'सीजेपी'चं जेलभरो आंदोलन; शिवाजी पार्कवर मोठा पोलीस बंदोबस्त

केंद्रीय निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आज (२ ऑक्टोबर) सीजेपीच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.

https://www.youtube.com/live/XslA_FyVSnQ?si=EJzI_VC-jUjNc7hf

14:59 (IST) 2 Oct 2026

“मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’; अभिजीत दिपकेंचा CM देवेंद्र फडणवीसांना इशारा

विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याविरोधात येत्या ०६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी आज (दि. ०२ ऑक्टोबर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP च्या वतीने मुंबईत शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला परवानगी नसली, तरी अजिबात मागे हटणार नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

CJP Jail Bharo Andolan Mumbai

“मी पुन्हा येईन, पुन्हा येईन’; अभिजीत दिपके यांचा फडणवीसांना इशारा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)