पालघर शहरात एका तरुण विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शहरातील देवीसहाय रस्ता येथील राहत्या घरी प्रतीक जैन या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना, त्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

प्रतीक घोलवड बोर्डी येथील महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता. प्रतिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पालघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.