कचरा मुक्त शहर म्हणून मानांकन

 वाई:स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये राज्यातील ६९पालिकांमध्ये साताऱ्यासह जिल्ह्यातील सात पालिकांना केंद्र शासनाचे कचरा मुक्त शहर म्हणून मानांकन मिळाले आहे.याबाबत २०नोव्हेंबर रोजी पालिकांना दिल्ली येथील विशेष कार्यक्रमात पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.

 सातारा,कराड,वाईसह पांचगणी, महाबळेश्वर, मलकापूर, रहिमतपूर या साताऱ्यातील पालिकांना स्वच्छ सर्वेक्षण २०२० मधील कचरा मुक्त शहर मानांकन झाले आहे. हे पुरस्कार नवी दिल्ली येथील विज्ञान भवनाममधे विशेष कार्यक्रमात दि २० नोव्हेंबर रोजी प्रदान करणेत येणार आहे असे स्वच्छ भारत मिशन (अर्बन), भारत सरकार, नवी दिल्ली येथील संयुक्त सचिव तथा मिशन डायरेक्टर श्रीम. रूपा मिश्रा  यांच्या कडून कळविणेत आले आहे.पालिकांनी कचरा मुक्तीसाठी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेऊन हा पुरस्कार या पालिकांना देण्यात आला आहे.

  सातारा जिल्ह्यातील सातारा ,वाई पांचगणी, महाबळेश्वर, मलकापूर, रहिमतपूर, कराड या पालिकांना कचरा मुक्त शहर म्हणून मानांकन मिळाले आहे.या उपक्रमात पाचगणी,महाबळेश्वर,कराड या पालिकांनी आपले स्थान कायम राखले आहे मात्र यात जिल्ह्यातील सात पालिकांचा समावेश होत असल्याने पालिका स्तरावर समाधान व्यक्त केले जात आहे.यावेळी राज्यातील ६९पालिकांना स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये समावेश झाल्याचे गुरुवार (दि ११) रोजी कळविण्यात आले. मात्र मानांकन कळविण्यात आलेले नाही. याबाबत ते बक्षीस प्रदान कार्यक्रमादिवशी कळविण्यात येणार आहे. या पालकांमध्ये नवी मुंबई,पुणे,धुळे,एरंडोल,कटोल,सासवड,जेजुरी,इंदापूर,

जुन्रर,मंगळवेढा,खेड,पन्हाळा,कुर्डुवाडी,गडचिरोली,भामरागड,जाफराबाद,शहापूर, खेड,विटा,अष्टा, गडहिंग्लज,ठाणे,खोपोली आदी पालिकांचा समावेश आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकांच्या नगराध्यक्षा,पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.