Devendra Fadnavis On Mahayuti Cabinet: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गुरुवारी (५ डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. यातच भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र, गृहमंत्री पद शिंदेंना देण्यास भाजपाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. या चर्चांवर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपा आणि शिंदे गटात गृहमंत्रिपदावरून खरंच रस्सीखेच सुरु आहे का? यावर बोलताना सर्व चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या. “भाजपा आणि शिवसेनेत गृहमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नाही. पण त्यावर आमची चर्चा सुरु होती”, असंही फडणवीसांनी म्हटलं. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा बातम्या माध्यमांमध्ये सुरु होत्या. मात्र, परिस्थिती अशी नव्हती. जेव्हा मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की हे पाहा मी देखील उपमुख्यमंत्री होऊ इच्छित नव्हतो. मात्र, मला तेव्हा माझ्या पक्षाने उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास सांगितलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर सरकार तुम्हाला चालवायचं असतं तेव्हा त्या पक्षाचा मजबूत व्यक्ती सरकारमध्ये असेल तर पक्ष व्यवस्थित चालतो. माझं हे मत एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं. ते म्हणाले ठीक आहे. माझी काही अडचण नाही. मला तुमच्या बरोबर काम करण्यास कोणतीही अडचण नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…

हेही वाचा : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत शिंदेंच्या शिवसेनेकडून सरकारची भूमिका स्पष्ट

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. हिवाळी अधिवेशन होण्याच्या आधी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे का?

भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यावर बोलताना ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेत गृहमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती. मात्र, त्यावर आमची चर्चा सुरु होती. गंभीर चर्चा देखील नव्हती. कसं असतं की गृहखातं, अर्थखातं असे काही खाते जे असतात. आता तीन पक्ष आहेत तर तिन्ही पक्षांना योग्य सन्मान झाला पाहिजे. तिन्ही पक्षांना योग्य सन्मान मिळाला हे दिसणंही महत्वाचं असतं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

स्थानिक निवडणुका महायुती एकत्र लढणार का?

विधानसभेनंतर आता महायुती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार दिले जातात. ते त्या ठिकाणी निवडणुका कशा लढवायच्या हे ठरवतात. त्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णयाचं स्वातंत्र्य असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता आम्ही ठाम काही सांगू शकत नाहीत. कारण ती निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. तुम्ही कार्यकर्त्यांना रोखू शकत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी युती होईल. ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader