Devendra Fadnavis On Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, दुसरीकडे विरोधकांनी महायुतीला मिळालेल्या यशावरून शंका उपस्थित करत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. यातच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे मारकडवाडी राज्याच चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज शरद पवार यांनी मारकडवाडी गावाला भेट देत सर्व गावात ठराव करा, आम्हाला ईव्हीएमवर मतदान नको. जुन्या पद्धतीने मतदान करायचं आहे, असा ठराव घ्या आणि आमच्याकडे द्या. त्यावर आम्ही निर्णय घेऊ आणि योग्य ठिकाणी पोहोचवू, असं शरद पवारांनी म्हटलं. दरम्यान, यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विधानसभेतील पराभव स्वीकारला पाहिजे, असा खोचक सल्ला शरद पवारांना दिला.

हेही वाचा : VIDEO : आमदारकीची शपथ घेताना गोंधळ का झाला? आमश्या पाडवी यांनी स्वत:च सांगितलं कारण

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“शरद पवारांनी जनतेचं ऐकावं. मात्र, कार्यकर्त्यांचं आणि खोट सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये. शरद पवार हे अतिशय जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे. जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे. विनाकारण लोकशाहीवरून लोकांचा विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवारांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“५० वर्षांपेक्षा जास्त राजकीय अनुभव असेलेल नेते शरद पवार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत नेत्यांनी संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो. मात्र, मला असंही वाटतं की, ते त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या दबावात असतील. मनातून त्यांना देखील माहिती आहे की जी काही कारण असतील. मात्र, पराभव झालेला आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.