केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ स्पष्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शाह सर्वप्रथम लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात करणार आहेत. दौऱ्यादरम्यान अमित शाह यांच्या भेट घेणार का? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. “महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेचं सरकारे स्थापन करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांची भेट घेणारचं” असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा- “हे गणपती बाप्पा मुख्यमंत्र्यांना…..”; राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे गणरायाला साकडे

मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यातून युतीबाबतची राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या भेटीमागच्या कारणाचे स्पष्टीकरण दिलं आहे.

राज ठाकरेंच्या भेटीमागचे नेमके कारण काय

या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारली आहे. “सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे. उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. त्यांचं मध्यंतरी ऑपरेशन झालं होतं प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन यासाठी मी आलो होतो. राजकीय चर्चाच झाली नाही, असं शिंदे म्हणाले.

हेही वाचा- रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल, म्हणाले…

शाहंच्या भेटीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?

दरम्यान अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत, त्यांची भेट घेणार का, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले की, अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युती आहे. आपल्याला माहितच आहे की, सरकराच्या पाठिशी…; असं म्हणत शिंदेंनी सूचक विधान केलं. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भक्कम पाठिशी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.