scorecardresearch

Premium

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी (४ ऑक्टोबर) जाहीर केली.

Shinde Fadnavis Pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली. (संग्रहित छायाचित्र)

मागील अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या वाटपाची चर्चा सुरू होती. सरकारमध्ये अजित पवार गटाचा सहभाग झाल्यानंतर या पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्षही सुरू असल्याचं बघायला मिळालं. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी (४ ऑक्टोबर) जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत मोठा बदल म्हणजे भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचं पालकमंत्रीपद काढून ते अजित पवारांकडे देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटलांना पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद दिलं आहे.

Bharat Gogawale
रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम; भरत गोगावले म्हणाले, “वर्णी लागत नाही तोवर…”
Chandrakant patil ajit pawar
पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा’; पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत चंद्रकांत पाटलांना ठरले वरचढ
ravindra tonge sudhir munguntiwar
उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांच्याशी वनमंत्री मुनगंटीवार यांची दोन तास चर्चा; अन्नत्याग आंदोलन सुरूच
Dhangar community
मराठा, ओबीसीनंतर आता धनगर समाज आक्रमक; धनगरांच्या भावनांचा उद्रेक झाला तर… आमदार पडळकरांचे सरकारला पत्र

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर – चंद्रकांत पाटील

अमरावती – चंद्रकांत पाटील

भंडारा – विजयकुमार गावित

बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर – हसन मुश्रीफ

गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

बीड – धनंजय मुंडे

परभणी – संजय बनसोडे

नंदूरबार – अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर असली, तर ज्या रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळाला त्याचा निर्णय या यादीत घेण्यात आलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त भार सध्या शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याकडेच आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde declare list of 11 district guardian minister pbs

First published on: 04-10-2023 at 13:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×