मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (४ ऑगस्ट रोजी) त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले होते. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरसर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती देताना मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून सातत्याने दौऱ्यावर असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसून त्यामुळे त्यांना त्रास झाल्याचं स्पष्ट केलंय. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात वाटणाऱ्या चिंतेबद्दलही मी त्यांना कळवलं असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.

नक्की पाहा >> Thackeray vs Shinde: फडणवीसांऐवजी शिंदेंना CM बनवण्यामागील कायदेशीर कारण आलं समोर; असा आहे BJP चा मास्टर प्लॅन

“मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात काय अपडेट्स आहेत?” असं पत्रकारांनी केसरकरांना गुरुवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारलं. यावर उत्तर देताना केसरकर यांनी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दिली. “मी जेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांची नियमित आरोग्य तपासणी सुरु होती. ते आजारी नाहीत. मात्र त्यांनी स्वत:ची फार दगदग करुन घेतली आहे,” असं केसरकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांना थकव्यामुळे विश्रांतीचा सल्ल डॉक्टरांनी दिल्याची माहिती समोर आली असून केसरकारांनी या थकव्या मागील कारण हे अपुरी झोप असल्याचं सांगितलं.

नक्की वाचा >> “या ‘जम्बो कॅबिनेट’चं लक्ष पूर्णपणे…”; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला खोचक टोला

“अनेक दिवस ते (मुख्यमंत्री शिंदे) (नीट) झोपलेले नाहीत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातात तेव्हा रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोक त्यांची वाट पाहत थांबलेले असतात. मग त्या लोकांना न भेटता निघून जाणं त्यांना योग्य वाटत नाही. म्हणून तीन वाजता ते एखाद्या ठिकाणी लोकांना भेटले आणि नंतर झोपायला गेले तरी पाच सहा वाजता झोपायचं मग सहा, सात वाजता उठायचं असं होतं. एक दोन तासांची झोप ही कोणालाही पुरेशी नसते. मात्र मुख्यमंत्री सातत्याने मागील आठ दिवसांपासून हे करत आहेत. ते अजिबात झोपत नाहीत,” असं केसरकर यांनी पत्रकारांना सांगितलं.

नक्की वाचा >> Shinde VS Thackeray: मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची भेट; ‘नंदनवन’ निवासस्थानी रात्री झालेली भेट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांनी आपल्या तब्बेतीची काळजी घेतली तर ते लोकांची अधिक चांगली सेवा करु शकतील, असं माझं व्यक्तीगत मत असून मी हे त्यांना बोलून दाखवलं आहे,” असंही शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.