एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना वाचावण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभे राहिले आहे. अशाच आता जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेना ताब्यात घेण्याची एकनाथ शिंदे यांची राक्षशी महत्त्वाकांशा असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि स्मिता ठाकरे यांच्या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष वाढत चालला आहे. आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जातो आहे. तर उद्धव ठाकरे यांनी ही एकनाथ शिंदे यांची राक्षसी महत्वकांशा असून शिवसेना गिंळकृत करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. ही लढाई आता न्यायालयापर्यंत पोहोचली आहे.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
Sambhaji Bhide Meets Devendra Fadnavis in Sangli
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानात संभाजी भिडेंनी नेमकं काय सांगितलं? चर्चांना उधाण
Kapil Patil met Raj Thackeray,
भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्याकडून मनसेचे राज ठाकरे यांची भेट
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका

दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीनंतर स्मिता ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना, आपण मुख्यमंत्री शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आली असल्याचे सांगितेल. तसेच शिवसेनेला पुढे नेण्यात सीएम शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचेदेखील त्या म्हणाल्या.

कोण आहेत स्मिता ठाकरे?

स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. एकेकाळी त्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध असलेल्या नाराजीमुळे त्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. जेव्हा शिवसेनेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती. त्यावेळी स्मिता ठाकरे यांचे नावही पक्षप्रमुख पदासाठी समोर आले येत होते. दरम्यान, स्मिता ठाकरे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नव्हती. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून जायचे होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी भारतकुमार राऊत यांना राज्यसभेवर पाठवल्याने तसेच शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व वाढत गेल्याने नाराज झालेल्या स्मिता ठाकरे यांनी राजकारणाला रामराम ठोकला. सद्या त्या एक एनजीओ चालवतात.